spot_img
महाराष्ट्रशेळीपालनातून किती उत्पन्न मिळते?, वाचा सविस्तर

शेळीपालनातून किती उत्पन्न मिळते?, वाचा सविस्तर

spot_img

Goat Farming : राज्यभरात गेल्या काही वर्षांपासून अनेकजण शेळीपालन व्यवसायाकडे वळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या व्यवसायाकडे खासकरून सुशिक्षित तरूण मंडळी अधिक आकर्षित होताना दिसत आहे. या व्यवसायाकडे अनेक गलेलठ्ठ पगारांची नोकरी करणारे तरूण नोकरी सोडून हा व्यवसाय करत आहेत. शासनही या व्यवसायाला वाढत असलेला प्रतिसाद पाहून अनेक योजना काढत आहेत. या व्यवसायाबद्द्ल मात्र तरूणांमध्ये अनेक गैरसमजही पसरत आहेत.

भरमसाठ उत्पन्न या व्यवसायात मिळते असाच समज परसताना दिसत आहे. उत्पन्न तर आहेच पण त्याची आकडेवारी चुकीची फिरत आहे. खरच किती आणि कसे उत्पन्न शेळीपालनातून मिळते हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याबद्दलची सविस्तर माहिती शेळीपालनातून मिळणा-या उत्पन्नांबद्दल खालील दोन व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.

जगात एकंदर ६२० दशलक्ष शेळया असून त्यापैकी १२३ दशलक्ष शेळया भारतात असून शेळयांच्या संख्येने जरी भारत प्रथम क्रमांकावर असला तरी त्यापासून मिळणारे उत्पन्न फार कमी आहे. देशातील दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी ३ टक्के दुध ४५ ते ५० टक्के मांस तर ४५ टक्के कातडी शेळयापासून मिळते. शेळयांच्या प्रमुख २५ जाती भारतात आढळतात. दुध उत्पादनाकरिता आपल्याकडील जमनापरी बिंटल सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी जाती तर बिटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी, इत्यादी जाती लोकर उत्पादनाकरीता बिटल, उस्मानाबादी,सुर्ती अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा मोहेर उत्पादनाकरीता वापरतात.

मंद गतीने या सर्व जातींची वाढ होते.साधारणपणे एका वर्षात सरासरी वजन २० किलो होते. या उलट विदेशी जातीच्या शेळया उदा.सानेन, टोने, बर्ग, अल्पाईन, एम्लोन्यूबियन, अंगोरा इत्यादी सुधारित जाती फारच झपाटयाने वाढतात. अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार जाती फारच झपाटयाने वाढतात. अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार असून नराचे सरासरी वजन १०० ते १२५ किलो तर मादीचे सरासरी वजन ९० ते १०० किलो असते. आपल्याकडे शुध्द जातीच्या शेंळया वापरावयाच्या असल्यास उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळया वापराव्या संकरित शेळया वापरल्यास अधिक उत्पन्न मिळते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अज्ञात वाहनाने बाप-लेकाला उडवले! ‘या’ रोडवर भीषण अपघात..

पाथर्डी | नगर सहयाद्री पाथर्डी-शेवगाव रोडवरील महावितरणच्या गेटजवळ सोमवारी सकाळी सव्वा सात वाजता मॉर्निंग...

१५०० रुपये कायमचे बंद? लाडकी बहीण योजनेतील १० लाख महिलांचे अर्ज बाद! यादीत तुमचेही नाव नाही ना?

मुंबई | नगर सहयाद्री राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी...

अहिल्यानगरमध्ये खळबळ! ठाकरे गटाच्या ‘बड्या’ नेत्याला अटक, कार्यालयातच केला महिलेवर अत्याचार..

संपर्क कार्यालयातच महिलेवर अत्याचार; शहरप्रमुख किरण काळे यांना अटक अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- अहिल्यानगरमधून एक खळबळजनक...

आजचे राशी भविष्य! आषाढ महिन्यातील मंगळवार ‘या’ राशींना ठरणार लाभदायक

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह...