spot_img
अहमदनगरमहापालिका आयुक्त जावळेंच्या मागावर किती पथके? कुठल्या स्किमसाठी मागीतली होती रोकड? पहा...

महापालिका आयुक्त जावळेंच्या मागावर किती पथके? कुठल्या स्किमसाठी मागीतली होती रोकड? पहा सविस्तर

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
१०५ निवासी प्लॅटच्या स्किमच्या मंजूरीसाठी लाच मागणारे महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे व पीए श्रीधर देशपांडे यांच्या शोधासाठी एसीबीची तीने पथके रवाना झाली आहेत. दरम्यान पीए देशपांडे यांच्या घराची झडती गुरूवारी रात्री ११ वाजता पूर्ण झाली. त्यांच्या घरातून ९ मालमत्तांची कागदपत्रे व बीड जिल्ह्यातील जमीनीच्या व्यवहारांची कागदपत्रे मिळून आली आहेत.

गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात नगर महापालिकेची मुदत संपली आहे. तेव्हापासून डॉ. जावळे हे आयुक्त तथा प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याविरूद्ध तक्रारदार फोर के रियाल्टी या नावाने बांधकाम व्यवसाय करतात. त्यांनी अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील नालेगाव येथे सुमारे सव्वा दोन हजार चौरस मीटर प्लॉट खरेदी केलेला आहे.

तेथे बांधकाम करण्यासाठी त्यांनी परवानगी मिळण्यासाठी त्यांनी १८ मार्च २०२४ रोजी महापालिकेकडे ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानुसार परवानगी देण्यासाठी आयुक्त जावळे यांनी पीए देशपांडे यांच्या मार्फत ९ लाख ३० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. तेथील पथकाने १९ जून व २० जून २०२४ अशा दोन दिवशी नगरला येऊन लाच मागणीची पडताळणी केली. पंचासमक्ष बोलणी करताना आरोपींनी ८ लाख रुपये लाच घेण्याचे कबूल केले. लाच घेण्यासाठी जावळे हे देशपांडे यांना प्रोत्साहन देत असल्याचे पंचासमक्ष केलेल्या पडताळणीत आढळून आले.

एसीबीच्या कारवाईची कुणकुण लागल्यानंतर पालिका आयुक्त आणि लिपिक हे दोघेही फरार झाले आहेत. या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशपांडेच्या बुर्‍हानगरमधील घरावर एसीबीकडून छापा टाकण्यात आला आहे. तर आयुक्ताचे कार्यालय व शासकीय निवासस्थान एसीबीने सील केले आहे. या दोन्ही ठिकाणी कर्मचार्‍यांच्या बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त पंकज जावळे यांनी लिपिक देशपांडे यांच्यामार्फत आठ लाखांची लाच मागितली होती. त्यानुसार गुरूवारी ही लाच स्वीकरण्यात येणार होती. पण एसीबीच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्त आणि लिपिक दोघेही फरार झाले. महत्त्वाचे म्हणजे या दोघांनीही गुरुवारी शासकीय रजा टाकल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आयुक्त पंकज जावळे व स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशपांडेच्या घरात सापडली रोकड, कागदपत्रे
पीए श्रीधर देशपांडे यांच्या घराची एसीबीच्या घराची झडती घेतली. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हे पथक दाखल झाले होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी पंचनाम केला. घरातून ९३ हजारांची रोकड, साडेआठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, तसेच उपनगरात प्रॉपर्टी खरेदी केल्यांची कागदपत्रे, तसेच बीड जिल्ह्यात शेतजमीन खरेदी केल्याची मोठी कागदपत्रे एसीबीच्या हाती लागली आहे.

सोलापूर मधील घरांची एसीबी घेणार झडती
आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. तसेच शासकीय निवासस्थान घर सील केले आहे. दरम्यान आयुक्तांचे सोलापूर येथे असलेल्या घराची एसीबीकडून झडती घेतली जाणार असल्याची माहिती आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...