spot_img
देशPolitics News: महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? मल्लिकार्जुन खरगे यांनी संगितला...

Politics News: महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? मल्लिकार्जुन खरगे यांनी संगितला आकडा, एकदा पहाच..

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
महाराष्ट्रात महाविकास आघाडी लोकसभेच्या ४८ पैकी ४६ जागा जिंकणार असल्याचा महत्त्वपूर्ण दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी इंडिया आघाडीच्या मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला. महाराष्ट्रात आम्हाला किमान ४६ जागा मिळतील असे वातावरण आहे. भाजप प्रणित महायुतीला शून्य जागा मिळतील असे मी म्हणत नाही. त्यांनाही काही ना काही जागा मिळतील. पण आमची आघाडी अधिकाधिक जागा जिंकून भाजपला हरवेल, असे ते म्हणाले.

मुंबईत शनिवारी सकाळी इंडिया आघाडीची पत्रकार परिषद झाली. या परिषदेला मल्लिकार्जुन खरगेंसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे बडे नेते हजर होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, महाराष्ट्रात विश्वासघात करून बेकायदा सरकार अस्तित्वात आले. त्याचे समर्थन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. एवढेच नाही तर समाजात दुही माजवण्याची भाषाही ते करतात. आपले विचार चुकीच्या पद्धतीने मांडून लोकांना भडकवण्याचे काम आजवर कोणत्याही पंतप्रधानाने केले नाही. मी ५३ वर्षांपासून राजकारणात आहे. त्यामुळे मी हे ठामपणे सांगू शकतो.देशात विश्वासघाताचे राजकारण सुरू आहे. मोदी सरकार संविधानाचा गैरवापर करत आहे. धमकी, प्रलोभने दाखवून विरोधी पक्षांत फूट पाडली जात आहे. सत्याची बाजू मांडणार्‍या पक्षांकडून पक्ष व चिन्ह काढून भाजपचे समर्थन करणार्‍या गटांकडे सोपवण्यात येत आहे. या सर्व गोष्टी मोदींच्या इशार्‍यानुसार होत आहेत. पण यावेळी जनता फसणार नाही.

आता ही लढाई खुद्द जनता लढत आहे. त्यात निश्चितच जनतेचा विजय होईल, असेही खरगे यावेळी बोलताना म्हणाले.पंतप्रधान मोदी लोकशाहीची वल्गना करतात. पण लोकशाहीवर अंमल करत नाहीत. त्यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही. गत २ वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत. ही मोदींची लोकशाही आहे, असेही मल्लिकार्जुन खरगे यावेळी म्हणाले.मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी इंडिया आघाडीने जनतेला दिलेल्या गॅरंटीवरही प्रकाशझोत टाकला. इंडिया आघाडीने जनेतला अनेक चांगली आश्वासने दिली आहेत.

यात रिक्त जागा भरणे, तरुणांना रोजगार मिळवून देणे, मनरेगा अंतर्गत शहरी भागातील लोकांना कामे देणे, तरुणांना १ लाखांचे अनुदान देणे, महिलांना महालक्ष्मी योजनेतून वार्षिक १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे, २५ लाखांचा आरोग्य विमा, शेतकरी व विद्यार्थ्यांना कर्जमाफी देणे, कृषी सामग्रीवरील जीएसटी रद्दबातल करणे आदी अनेक गोष्टींचा समावेश आहे, असे देखील खरगे यावेळी म्हणाले. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. त्यामुळे संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी देशात आघाडीचे सरकार येणे आवश्यक आहे. देशात आमचे सरकार येणार हे पूर्वनिश्चित असून, यापुढे धमक्यांचे राजकारण चालणार नाही, असेही मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी भाजपला खडसावून सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...