spot_img
देशअहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रातील किती जण दगावले? धक्कादायक आकडेवारी समोर, वाचा यादी…

अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रातील किती जण दगावले? धक्कादायक आकडेवारी समोर, वाचा यादी…

spot_img

 

Ahmedabad Plane Crash : अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI-171 चा टेकऑफनंतर अवघ्या १२-१५ सेकंदांत भीषण अपघात झाला. मेघानीनगर परिसरातील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर विमान कोसळल्याने २४१ प्रवासी, क्रू मेंबर्स आणि जमिनीवरील २४ जणांसह एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

या विमानात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनेडियन नागरिक होते. केवळ एक प्रवासी, विश्‍वासकुमार रमेश, चमत्काराने वाचला. ही घटना भारतीय हवाई इतिहासातील सर्वात भयंकर दुर्घटनांपैकी एक ठरली आहे.

विमानाने टेकऑफ केल्यानंतर वैमानिक कॅप्टन सुमीत सभरवाल यांना विमान आवश्यक उंची गाठत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ ‘मे-डे’ कॉल पाठवला, पण मदत मिळण्यापूर्वीच विमान कोसळले, आणि प्रचंड आग लागली. या अपघाताने संपूर्ण जग हादरले आहे.

महाराष्ट्रातील मृतांची यादी
सुमित सबरवाल (विमानाचे मुख्य पायलट)- मुंबईतील चांदिवली भागातील रहिवासी
सिविक कुंदर – (विमानाचे को-पायलट)- मुंबईतील बोरिवली भागातील रहिवासी
अपर्णा महाडिक (क्रू मेंबर): अपर्णा या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांच्या नातेवाईक आहेत.
मैथिली पाटील (क्रू मेंबर): मैथिली एअर इंडियाच्या केबिन क्रू मेंबर.
दीपक पाठक – (क्रू मेंबर) एअर इंडियाचे केबिन क्रू मेंबर होते आणि ते बदलापूरमध्ये राहत होते.
रोशनी राजेंद्र सोनघरे (क्रू मेंबर): रोशनी या महाराष्ट्रीयन क्रू मेंबर होत्या. त्या मूळच्या डोंबिवलीच्या आहेत.
महादेव पवार (प्रवासी): मुळचे सांगोल्याचे असलेले महादेव या विमानातून लंडनला जात होते.
आशा पवार (प्रवासी): आशा या महादेव यांच्या पत्नी असून त्या देखील याच विमानातून प्रवास करत होत्या.
मयूर पाटील (प्रवासी): मयुर हे महाराष्ट्रातील प्रवासी होते, ज्यांचा या अपघातात मृत्यू झाला.
यशा कामदार (प्रवासी): यशा या मूळच्या नागपूरच्या असून त्या लंडनला जात होत्या.
रक्षा मोदा (प्रवासी): यशा यांच्या सासू रक्षा मोदा या देखील लंडनला जात होत्या
रुद्र मोदा (प्रवासी): यशा कामदार यांचा दीड वर्षीय मुलगा रुद्र मोदा हा देखील याच विमानातून प्रवास करत होता.
दीपक पाठक यांचा शेवटचा कॉल

बदलापूरचे रहिवासी आणि ११ वर्षांपासून एअर इंडियात कार्यरत असलेले दीपक पाठक यांनी टेकऑफपूर्वी सकाळी आपल्या आईशी फोनवर गप्पा मारल्या होत्या. या संभाषणात त्यांनी विचारपूस केली, पण तोच त्यांचा शेवटचा कॉल ठरला. “जोपर्यंत त्यांचा फोन वाजत राहील, तोपर्यंत आम्हाला या बातमीवर विश्वास बसणार नाही,” असे त्यjama2>दीपक यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

डॉक्टर दाम्पत्यासह ३ मुलांचा विमान अपघातात मृत्यू
या अपघाताने बांसवाडा येथील व्यास कुटुंबातील पाच जणांचा अंत झाला. डॉ. प्रतीक जोशी आणि डॉ. कोमी व्यास यांच्यासह त्यांच्या तीन मुलांचा प्रद्युत, मिराया आणि नकुल यांचा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला.

लंडनला नवजीवन सुरू करण्याच्या स्वप्नांसह विमानात बसताना काढलेला सेल्फी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा क्षण ठरला. हा हृदयद्रावक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

तपास सुरू
अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी DGCA आणि बोईंगने सखोल तपास सुरू केला आहे. एक ब्लॅक बॉक्स सापडला असून, दुसऱ्याचा शोध सुरू आहे. ब्लॅक बॉक्समधून मिळणारी माहिती अपघाताच्या कारणांचा उलगडा करेल, अशी आशा आहे. या दुर्घटनेने महाराष्ट्रासह संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या जात असून, तपास पूर्ण होईपर्यंत प्रश्नचिन्ह कायम आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

पारनेर । नगर सहयाद्री:- वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी...