spot_img
ब्रेकिंगविधानसभेचा महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा? अजितदादांना किती जागा मिळणार,मोठी माहिती आली...

विधानसभेचा महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा? अजितदादांना किती जागा मिळणार,मोठी माहिती आली समोर..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
लोकसभेनंतर आता राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता जोमाने कामाला लागले आहेत. त्यातच महायुतीमधील जागावाटपावरून सध्या ओढाताण सुरु असल्याचे दिसत आहे. शिंदे गट १०० तर अजित पवार गट तब्बल ९० जागांवर लढण्यासाठी आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे.

तर दुसरीकडे रिपाईचे प्रमुख रामदास आठवले यांनीही १० जागांची मागणी केली आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारा राज ठाकरे यांचा मनसे पक्ष विधानसभेच्या २० जागांवर लढण्याची शयता आहे. भाजपाने १५५ जागांवर उमेदवारी करण्याची तयारी सुरु केली असल्याचे जागावाटपावरुन सध्यातरी ताणाताणी सुरु झाली आहे.

दरम्यान, सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आतापर्यंत ते विधानसभेच्या नेमया किती जागा लढणार, याची माहिती समोर आली नव्हती. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार भाजपने विधानसभा निवडणुकीत १५५ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करण्याची तयारी सुरु केल्याची माहिती आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वाखालील शिवसेनेसाठी ६० ते ६५ आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससाठी ५० ते ५५ जागा सोडण्याची तयारी आहे. तर महायुतीमधील अन्य तीन मित्रपक्षांसाठी १५ जागा राखून ठेवण्याची भाजपची योजना आहे.

त्यामुळे आता जागावाटपाच्या चर्चेवेळी रामदास आठवले, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.लोकसभा निवडणुकीत महायुतीला अवघ्या १७ जागांवर विजय मिळाला होता. तर मविआने ३० जागांवर बाजी मारली होती. एक जागा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी जिंकली होती. भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २३ खासदार निवडून आणले होते. मात्र, यंदा भाजपचे फक्त ९ उमेदवार विजय झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काय घडणार, या विचाराने महायुतीच्या गोटातील धाकधूक वाढली आहे.

महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला?
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर महाविकास आघाडीनेही विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत मविआच्या नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली होती. सुरुवातीला विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष १०० ते १०५ जागांवर निवडणूक लढवू शकतो. तर ठाकरे गटाच्या वाट्याला ९० ते ९५ जागा येऊ शकतात आणि शरद पवार गट विधानसभेला ८० ते ८५ जागांवर लढू शकतो, अशी चर्चा होती. मात्र, त्यानंतर मविआने विधानसभेसाठी ९६-९६-९६ चा फॉर्म्युला निश्चित केल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभेला लवकरात लवकर उमेदवारांची घोषणा होण्याची शयता आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...