spot_img
ब्रेकिंगवैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

spot_img

पुणे / नगर सह्याद्री –
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सूनेने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. वैष्णवी हगवणे हीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे म्हटले जात होते. पण वैष्णवीने आत्महत्या नसून, खून झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या घटनेनंतर वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केली. तर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा सुशील हगवणे फरार आहे.

वैष्णवी हगवणेचा शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. बीजे हॉस्पिटलने दिलेल्या अहवालनुसार, वैष्णवीचा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या फासाने झाला आहे. तिच्या मृतदेहावर धारदार वस्तूने वार केलेल्या खूप साऱ्या जखमा देखील आढळून आल्या आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरणातील ऑडिओ क्लिप समोर आली आहे. आत्महत्या करण्याच्या दोन ते तीन दिवसांपूर्वी वैष्णवीने तिच्या मैत्रिणीला स्वत:ची आपबिती सांगितली होती. सतत होणारे चारित्र्याचे आरोप, मारहाण आणि हुंड्यासाठी होणारा छळ याबद्दल वैष्णवीने मैत्रिणीकडे बोलून दाखवल्या होत्या.

२८ एप्रिल २०२३ रोजी वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नात ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी अशा अनेक गोष्टी हुंडा म्हणून देण्यात आल्या होत्या. लग्नानंतर सासरकड्यांनी वैष्णवी आणि तिच्या माहेरच्या मंडळींकडे चांदीच्या भांड्यांची मागणी केली. छोट्या-छोट्या कारणांवरुन वैष्णवीचा छळ सुरु केला. ऑगस्ट २०२३ मध्ये ती गर्भवती असताना शशांकने चारित्र्यावर संशय घेत वैष्णवीला मारहाण करत घरातून बाहेर काढले होते, असे वैष्णवीच्या वडिलांनी म्हटले आहे.

२७ नोव्हेंबर २०२३ रोजी छळाला कंटाळून वैष्णवीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचारांनंतर वैष्णवी बरी झाली, पण तिचा छळ सुरुच राहिला. शशांकने वैष्णवीच्या वडिलांकडे २ कोटींची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने वैष्णवीला धमक्या देण्यात आल्या, तिला माहेरी सोडले. त्यानंतर १६ मे २०२५ रोजी वैष्णवीने गळफास घेतल्याचे समोर आले. रुग्णालयात तिला बेशुद्ध अवस्थेत नेण्यात आले. डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

पुण्यातील अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणी आणखी एक माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणेचा शवविच्छेदन अहवाल टीव्ही9 च्या हाती आला आहे. वैष्णवीच्या संपूर्ण शरीरावर जखमा आढळून आल्या असल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. मात्र या घटनेनंतर आता वैष्णवी हगवणे हिच्या वडिलांनी सासरच्या मंडळींनी हुंड्यांसाठी आपल्या मुलीचा छळ केल्याचा आरोप केला. वैष्णवीचं लग्न अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांचा मुलगा शशांक हगवणे याच्याशी झालेला होता. यावेळी लग्नात फोरचूनर गाडी, 51 तोळे सोनं आणि 7.5 किलो वजनाचं चांदीचं ताट वैष्णवीच्या वडिलांनी दिलं होतं. असं असूनही तिचा हुंड्यासाठी छळ झाल्याचं वैष्णवीच्या वडिलांचं म्हणण आहे. आता वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून यात वैष्णवीच्या शरीरावर जखमा असून या जखमांमुळेच तिचा मृत्यू झाला असल्याचं या अहवालात म्हंटलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

तू फालतू तू घणेरडी आहे
या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये लग्न करून मी चूक केली, असं वैष्णवी म्हणताना दिसत आहे. “मला ताई म्हणाली मी तुझी सगळीकडे बदनामी करते. जे केलंय, जे केलं नाही ते सगळं सांगते. मला म्हणाली की तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते. शशांकसोबतही तू कधी लॉयल नव्हती, असं मला ताई म्हणाली. तू फालतू तू घणेरडी आहे, असं म्हणत होती. पप्पा आणि मम्मी यांनाही ती काही काही म्हणत म्हणत होती,” असं या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला येत आहे.

मी त्या माणसाला घटस्फोट देणार
तसेच, मला मारताना दाजी बघत होते. त्यानंतर त्यांनीपण माझ्यावर हात उचलला. विशेष म्हणजे दाजींनाही ते खरं वाटलं आहे. त्यामुळे मी त्या माणसाला घटस्फोट देणार आहे. मी पप्पांना हे सांगितलं आहे. आपण त्यावर विचार करू, असं मला पप्पांनी सांगितलं आहे, असंही वैष्णवीच्या या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत.

इथंच माझी चूक झाली
मला खूप आश्चर्य वाटत आहे. माझा नवराच माझा कधी झाला नाही. सासू-सासरे यांच तर तसंच वागणं असतं. मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं. इथंच माझी चूक झाली. मी त्या घरात जाऊन चूक केली. सगळं बोलण्याच्या, समजण्याच्या पलीकडे गेलं आहे. ही छोटी गोष्ट आहे, असंही या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील पिंपरी येथील वैष्णवी हगवणे नावाच्या विवाहितेचा मृत्यू झाला आहे. 16 मे 2025 रोजी तिने तिच्या आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तिने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आला आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. पती, सासू-सासरे तसेच नंदेकडून तिचा जाच केला जायचा, असा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे वैष्णवी आणि तिचा नवरा शशांक यांचा प्रेमविवाह होता. घरच्यांच्या विरुद्ध जाऊन वैष्णवीने हे लग्न केलं होतं. परंतु तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात येत होता. लग्नात तिच्या माहेरच्यांनी हुंडा म्हणून तब्बल 51 तोळे सोनं दिलं होतं. तसेच फॉर्च्यूनर गाडीही दिली होती. यासह महागडी भांडी, लग्नानंतर चांदीची मूर्ती, दीड लाखांचा मोबाईल असं बरंच काही वैष्णवीच्या घरच्यांनी तिच्या सासरच्या मंडळींना दिलं होतं. तरीदेखील तिचा जाच केला जात होता, असा आरोप करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! मुख्याध्यापिकेनेच शिक्षक पतीला संपवलं, मृतदेह टाकला जाळून, कुठे घडला प्रकार पहा

यवतमाळ / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे....

IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; ‘सर्वोच्च न्यायालयाने जामीन..’

मुंबई । नगर सहयाद्री:- वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च...

नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले...

पाऊस आला.. कांदा झाकला.. तरी पण भिजला..; जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान!

सुपा | नगर सह्याद्री गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावत आहे. मंगळवार...