spot_img
महाराष्ट्रबाळासाहेब थोरात पडलेच कसे?; राज ठाकरेंची तोफ धडाडली

बाळासाहेब थोरात पडलेच कसे?; राज ठाकरेंची तोफ धडाडली

spot_img

अजितदादांचे 42 आमदार कसे निवडून आले?
मुंबई | नगर सह्याद्री
महाराष्ट्रात निकाल लागल्यावर सन्नाटा पसरला होता. 14000 लोकांच्या गावातून फक्त राजू पाटील यांनाच मतदान झालं होतं, यावेळी एकही मतदान झालं नाही. अजूनही निवडून आलेल्यांना विश्वास बसत नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सातवेळा आमदार झाले, आठवी टर्म होती. सातवेळा सत्तर हजार मतांनी निवडून यायचे ते या निवडणुकीमध्ये 10 मतांनी पराभव होतो. चार ते पाच जागा येतील की नाही असं सर्वांना वाटत असताना अजित पवार 42 कोणाचा तरी विश्वास बसेल का? असा सवाल राज ठाकरेंनी केला.

जे इतकी वर्षे महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावर अजित पवार, भुजबळ मोठे झाले त्या शरद पवारांना 10 जागा मिळतात. हे न समजण्यापलीकडची गोष्ट आहे. चार महिन्यांपूव झालेल्या लोकसभा निवडणुकीला काँग्रेसचे सर्वाधिक 13खासदार निवडून आले. एका खासदाराखाली साधारण 6 आमदार येतात, सर्वसाधारपणे काँग्रेसचे तीन खासदार यायला पाहिजे होते त्यांचे 15 आमदार येतात. शरद पवारांचे 8 खासदार निवडून आलेत त्यांचे 10 आमदार येतात.

लोकसभेला अजित पवारांचा 1 खासदार निवडून आला तिथे 42 आमदार निवडून येतात. चार महिन्यात लोकांच्या मनात फरक पडला, काय झालं आणि कशामुळे झालं हा संशोधनाचा विषय आहे. या मतदानावरती जाऊ नका फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. तुम्ही कुठेही मनात धरू नका की लोकांनी मतदान केलं नाही, लोकांनी केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं. अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवलेल्या बऱ्या. कोणी कुठच्य गोष्टीचा अमरपट्टा घेऊन आलेला नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ज्या गोष्टी पक्षाने तुम्हाला सांगितल्या आणि केल्य त्या गोष्टी सतत लोकांसमोर मांडल्या पाहिजेत. मला चार लोकांनी प्रश्न विचारल्यावर भांबावून जाणं हे काही चांगलं लक्षण नव्हे. मी काही गोष्ट आणल्यात ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. जाणीवपूर्वक केलेला प्रचार असतो, तिथे जर तुम्ही खमके नसाल तर उत्तर काय देणार आहेत. काही पत्रकार हे पक्षाच्या दावणीला बांधले गेले आहेत. तेच या गोष्टी सांगत असतात आणि लिहित असतात. त्यामधील महत्त्वाचा भाग म्हणजे, राज ठाकरे भूमिका बदलतात. पदाधिकाऱ्यांनी मला हा प्रश्न केला म्हणजे भूमिका बदलल्या म्हणजे काय असतं, असं राज ठाकरे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर हादरले! बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालकाचा मृत्यू

तालुक्यात एकाच आठवड्यात दुसरी घटना; वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वाढता प्रवेश चिंताजनक पारनेर / नगर सह्याद्री पारनेर...

अ‍ॅपल कंपनीचे सरप्राईज; आज iPhone 17 होणार लाँच; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या…

iPhone 17 Launch 2025 अ‍ॅपल कंपनीने ९ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजता iPhone 17...

आजचे राशी भविष्य! ‘या’ ७ राशींसाठी शुभ दिवस, कामात मिळणार यश; धनलाभ होणार..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ...

पक्षापेक्षा कोणीही मोठं नाही : आमदार दाते यांचे मोठे विधान

पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पारनेर / नगर सह्याद्री रविवार दिनांक ७...