spot_img
अहमदनगरशेवगाव, पाथर्डीत घरफोडी करणारी टोळी जेरबंद; गुन्हे शाखेकडून नऊ गुन्ह्याची उकल

शेवगाव, पाथर्डीत घरफोडी करणारी टोळी जेरबंद; गुन्हे शाखेकडून नऊ गुन्ह्याची उकल

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
शेवगाव, पाथर्डी तालुक्यात घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. त्याच्याकडून ९ गुन्ह्याचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. तसेच २ लाख १७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

विनोद सक्या भोसले, (वय २५, रा.निपाणी जळगाव, ता.पाथर्डी), सचिन भाऊसाहेब काळे, (वय २१, रा.लखमापुरी, ता.शेवगाव), असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच या गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता सदाचा गुन्हा विकास विठ्ठल भोसले, (रा.उमापूर, ता.गेवराई, जि.बीड) याचे मदतीने केला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गुन्हयातील चोरलेले काही सोन्याचे दागीने हे लक्ष्मीकांत सांडुशेठ मुंडलिक, (रा.सोनार गल्ली, बिडकीन, ता.पैठण, जि.छ.संभाजीनगर) यास विकल्याचे तपासात पुढे आले आहे.

आरोपी व त्यांचा साथीदार विकास विठ्ठल भोसले यांचेसह मागील दोन-तीन महिन्यात पाथर्डी व शेवगाव तालुक्यात वेगवेगळया घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिक तापासाठी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बदनामी करण्याची धमकी देत तरूणीवर अत्याचार; कुठे घडला प्रकार आणि कोण आहे आरोपी…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - बदनामी करण्याची धमकी देत तरूणीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर...

निवडणूक संपली; ताबेमारी सुरू, टोळ्यांचा म्होरक्या कोण?

नगर शहरात कायद्याचा नव्हे, काय द्यायचा धाक अहिल्यानगर | नगर सह्याद्री मोकळा भूखंड दिसला की त्यावर...

श्रीगोंद्यात अवैध धंदे जोरात!; अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने हप्तेखोरी वाढली | गुन्हेगारांसह कमीशन वाल्यांचा अड्डा!

श्रीगोंदा | नगर सह्याद्री गुन्हेगारांसह अवैध धंद्यांचे माहेरघर अशी ओळख अशी नवी ओळख श्रीगोंदा शहराची...

धक्कादायक! फळबाग नसतांना शेतकर्‍यांनी उतरविला विमा

कृषी विभागाच्या तपासणीत धक्कादायक वास्तव समोर | बोगस विम्याने शेतकरी अडचणीत सुनील चोभे /...