spot_img
अहमदनगर‘लाडक्या बहिण’ च्या विरोधात कोर्टात जाणाऱ्या भावांना घरी बसवा; आमदार शिंदेंचे विरोधकांवर...

‘लाडक्या बहिण’ च्या विरोधात कोर्टात जाणाऱ्या भावांना घरी बसवा; आमदार शिंदेंचे विरोधकांवर कडवे टीकास्त्र

spot_img

जामखेड। नगर सहयाद्री:-
खर्डा येथे आयोजित ‘मान नात्याचा भाऊ-बहिणीं’च्या रक्षाबंधन समारंभात आमदार प्रा. राम शिंदे यांनी विरोधकांवर कडवे टीकास्त्र सोडले ‘लाडकी योजना बंद पडावी’ म्हणून खोटी अफवा पसरवणाऱ्या सावत्र भावांना आगामी विधानसभा निवडणुकीत घरीच बसवले जाईल असे ते म्हणाले.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’च्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याच्या वितरणानंतर त्यांनी महिलांशी संवाद साधला. आ. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार महिलांना न्याय देण्यास कटिबद्ध आहे.

महायुती सरकारने रेशन दुकानावर मोफत धान्य, महिलांना वर्षातून तीन मोफत सिलेंडर आणि आनंदाचा शिधा यासारख्या योजनांचा लाभ दिला आहे. आगामी काळात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत वाढवून तीन हजार रुपये करण्यात येईल असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या समारंभात महिलांना राख्या बांधून सत्कार करण्यात आला आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने साड्यांचे वाटप केले गेले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये गुटख्याची वाहतूक करणारी टोळी पकडली!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- गुटख्याची वाहतूक करणार्‍या टोळीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष...

वारकऱ्याला काठीने मारहाण; पंढरीत नेमकं काय घडलं?

Maharashtra News: आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या संख्येने आलेल्या वारकऱ्यांमध्ये आज सकाळी मोठी खळबळ उडाली, जेव्हा...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या जातकांना संकटांचा सामना करावा लागणार?

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

प्रति पंढरपूर पळशी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध : सुजित झावरे पाटील

आषाढी एकादशी निमित्त आरती व महापूजा; भाविकांची अलोट गर्दी/ पारनेर पोलीस प्रशासनाचा पळशी येथे...