spot_img
महाराष्ट्रहॉटेल चालकानी तरूणीला संपवल!, बड्या नेत्याच्या गावात 'धक्कादायक' प्रकार

हॉटेल चालकानी तरूणीला संपवल!, बड्या नेत्याच्या गावात ‘धक्कादायक’ प्रकार

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
श्रीगोंदा तालुक्यातील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या तरुणीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची खळबळजनक घटना रविवारी उघडकीस आली. फातिमा उर्फ आसमा शोयबउल्ला शेख असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी कल्याण राजेंद्र पठारे (रा. बनपिंप्री) यास पोलिसांनी अटक केली आहे.

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामधील एका बड्या नेत्याचे गाव असलेलया बनपिंप्रीतील हॉटेल प्रशांत मध्ये सदरचा प्रकार घडला. फातिमाचा मृतदेह हातवळण (ता. अहिल्यानगर) येथील शेत गट क्रमांक 111 मध्ये पुरण्यात आला होता. कल्याण पठारे हा या हॉटेलचा चालक असल्याची माहिती समोर आली असून त्याने गुन्ह्यांची कबूली दिली आहे.

संशयित आरोपीने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने स्कॉर्पिओ (एमएच 16 एटी 6979) वाहनातून मृतदेह नेऊन शेतात पुरल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनोहर हनुमंत खिळदकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी (18 मे) पहाटे कल्याण पठारे व त्याच्या साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक; पाच दिवसात पैसे जमा न झाल्यास…, काय दिलाय इशारा पहा

  पारनेर / नगर सह्याद्री- पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या 'सिस्पे कंपनी'...

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी - सचिव...

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...