spot_img
ब्रेकिंगउन्हाचा चटका! दोन-तीन दिवस उकाडा वाढणार; 'या' जिल्ह्यात सर्वाधिक तापमान

उन्हाचा चटका! दोन-तीन दिवस उकाडा वाढणार; ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक तापमान

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री:-
फेब्रुवारी महिन्यातच यंदा उन्हाळ्याची सुरुवात झाल्याचे चित्र असून, उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. रविवारी सोलापूर येथे उच्चांकी 36 अंश तापमानाची नोंद झाली. सोमवारी कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात थंडी ओसरली असून, कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे.

रविवारी (ता. 9) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये सोलापूर, रत्नागिरी, जेऊर आणि अकोला येथे तापमान 35 अंशांपार आहे. अनेक ठिकाणी तापमान 32 ते 35 अंशांच्या दरम्यान असल्याने उन्हाच्या झळा कायम आहेत.येत्या दोन दिवसांत पुण्यातील कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे आणखी उकाडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, किमान तापमान मात्र पुढील काही दिवस स्थिर राहणार असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

पुण्यातील बहुतांश भागातील कमाल तापमान रविवारी 34 ते 35 अंशाच्या दरम्यान नोंदवले गेले. कोरेगाव पार्क, मगरपट्टा येथे ते जास्त होते, तसेच किमान तापमानही पुण्यातील 25 वेगवेगळ्या भागांमध्ये 22.7 ते 14.4 च्या दरम्यान नोंदवले गेले. यापैकी 22.7 हे दापोडी, तर वडगावशेरी, चिंचवड, लवळे येथे 20 च्या दरम्यान होते. राजगुरुनगर, आंबेगाव, निमगिरी येथे 17 अंशाच्या दरम्यान ते होते. येत्या आठवडाभरात आकाश निरभ्र राहणार असून, सकाळी विरळ धुके पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला.महाराष्ट्रातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील चार दिवसांत कमाल तापमान दोन ते तीन अंशाने वाढण्याचा अंदाज आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...