spot_img
ब्रेकिंगAhmednagar: बॅग पळवणारे 'घोडके' अडकले जाळ्यात!! 'असा' लावला सापळा

Ahmednagar: बॅग पळवणारे ‘घोडके’ अडकले जाळ्यात!! ‘असा’ लावला सापळा

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
नगर शहरातील व्यापार्‍यांच्या गल्ल्यातील रोख रकमा चोरणारे, बॅग लिफ्टिंग करणारे दोन सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहेत. दोन दिवसांपूर्वी दिल्लीगेट येथे कार्यालयातून झालेली ३ लाखांची चोरी, तसेच दिवाळी काळात मंगलगेट येथील दुकानातून २ लाखांची चोरी व बाजारपेठेतून ५० हजारांची रोकड असलेली बॅग चोरी, असे तीन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यामुळे यश आले आहे. आरोपींकडून २.१० लाखांची रोकड हस्तगत केली आहे.

विठ्ठल संजय घोडके (वय २४) व सचिन सुभाष घोडके (वय ३३, दोघे रा. घोसपुरी, ता. नगर) अशी आरोपींची नावे आहेत. दिवाळीत शहरातील बाजारपेठेत चोरीच्या घटना वाढल्या होत्या. आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांना धारेवर धरत उपोषणाचा इशारा दिला होता. तसेच, दोन दिवसांपूर्वी दिल्लीगेट येथे चोरी झाली होती. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.

पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सपोनि हेमंत थोरात, पोहेकॉ सुनील चव्हाण, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डिले, भीमराज खर्से, पोकॉ अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व चापोहेकॉ संभाजी कोतकर यांचे पथक नियुक्त केले होते. तपास सुरू असताना हे गुन्हे विठ्ठल घोडके व सचिन घोडके यांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी नगर-दौंड रोड येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी तिन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपी घोडके याच्यावर पाच गुन्हे दाखल आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...