spot_img
ब्रेकिंगभयंकर हत्याकांड…! नवऱ्याने बायकोचे तुकडे केले अन् सुटकेसमध्ये भरले...

भयंकर हत्याकांड…! नवऱ्याने बायकोचे तुकडे केले अन् सुटकेसमध्ये भरले…

spot_img

Murder Case : पत्नीच्या हत्येचे नवे प्रकरण समोर आले आहे. एका भयानक घटनेत महाराष्ट्रातील एका सॉफ्टवेअर व्यावसायिकाने गुरुवारी बेंगळुरू येथील त्याच्या घरी आपल्या पत्नीची चाकूने वार करून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर तिचा मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून ठेवला. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पण हत्येनंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी पुण्याजवळून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. गौरी अनिल सांबेकर (वय-32) असे पीडितेच्या नाव आहे. तर राकेश राजेंद्र खेडकर (वय 36) असे आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी: राकेश खेडकर हा महाराष्ट्रातील आहे. तो सॉफ्टवेअर प्रोफेशनमध्ये बंगळुरूमध्ये कार्यरत आहे. आरोपी राकेश आणि गौरी यांच्यात किरकोळ कारणातून अनेकदा वाद होत होते. बुधवारी रात्री जेवण करत असताना दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर पत्नी गौरीने आधी राकेशला मारले. यानंतर संतापलेल्या राकेशने किचनमधील चाकू घेऊन गौरीवर हल्ला केला.

त्याने तीन वार करत गौरीला रक्ताच्या थारोळात पाडले. यानंतर तिचा गळा चिरल्याचं सांगितले जात आहे. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले. गुरूवारी ही घटना उघडकीस आली. मात्र मृतदेहाचे खरंच तुकडे केले होते का? याला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिला नाही. हत्येनंतर आरोपीनं गौरीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि ही सुटकेस घरातील बाथरुममध्ये नेऊन ठेवली.

हत्येनंतर आरोपी राहत्या घरातून फरार झाला. बंगळुरू सोडल्यानंतर त्याने घरमालक आणि सासरच्यांना फोन करून पत्नीला मारल्याची माहिती दिली. सासू-सासऱ्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर तपास सुरू झाला. पुण्यातून राकेश याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाप्पा गणेशा, जरांगे पाटलांच्या जोडीने तुझंही स्वागत!

आयजी कराळे साहेब, वर्षभरापूर्वी तुमच्या डीजे बंदीला तुमच्याच अधिकाऱ्यांनी फाट्यावर मारले! कोण आवर घालणार...

शहर हादरलं! पोटच्या मुलाने आईला संपवलं, धक्कादायक कारण उजेडात..

Maharashtra Crime News: रएक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शांतीनगर परिसरात मुलानेच स्वतःच्या आईची...

मनोज जरांगेंना हायकोर्टाचा दणका, आरक्षणाबाबत सरकारने केली मोठी घोषणा

जालना | नगर सह्याद्री:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले...

बाप्पाच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज; मंडळांची तयारी पूर्ण, पहा, फोटो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सवाचा जल्लोष रंगू लागला आहे. बाप्पाच्या...