spot_img
ब्रेकिंगवारकरी संप्रदायाच्या संस्थानामध्ये भयंकर प्रकार; महाराजांसह पाच जणांनी पालकांना खोलीत कोंडल अन्..

वारकरी संप्रदायाच्या संस्थानामध्ये भयंकर प्रकार; महाराजांसह पाच जणांनी पालकांना खोलीत कोंडल अन्..

spot_img

बीड । नगर सहयाद्री:-
बीड जिल्ह्यातील तपभूमी येथील वारकरी संप्रदायाच्या संस्थानात महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चक्क विद्यार्थ्याच्या पालकाला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अॅडमिशन रद्द झाल्यानंतर भरलेले डोनेशन मागितल्याने संतप्त झालेल्या संस्थाचालकांनी पालकाला खोलीत कोंडून मारहाण केली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

गेवराई तालुक्यातील चिखली येथील मनोहर कचरू वारे यांनी आपल्या मुलाला तपभूमीच्या वारकरी शिक्षण संस्थेत शिकण्यासाठी पाठवले होते. यावेळी संस्थेचे सत्यवान महाराज लाटे यांनी ५० हजार रुपयांचे डोनेशन मागितले, त्यातील ३० हजार रुपये वारे यांनी भरले. मात्र काही कारणास्तव अॅडमिशन रद्द करण्यात आले. अॅडमिशन रद्द झाल्यानंतर वारे यांनी संस्थेकडे भरलेले पैसे मागितले.

संतप्त होऊन महाराज आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांनी “पैसे मागतोस? तुला बाहेर जाऊ देणार नाही,अशी धमकी देत वाऱेंना संस्थानातील खोलीत कोंडले आणि अमानुष मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मनोहर वारे यांना पायावर, पाठीवर आणि हातावर मारहाण होत असल्याचे स्पष्ट दिसते. त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे.

या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात सत्यवान महाराज लाटे आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक आणि अध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये घडणारी ही घटना केवळ धक्कादायकच नव्हे, तर संप्रदायाच्या नावाखाली होत असलेल्या गैरप्रकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रात हळहळ! दुर्घटनेत १७ जणांचा अंत, काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - विरारच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा काही...

तुम्ही त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांचा खर्चपाणी तिथूनच चालतो, ते तुम्हाला काय पाणी देणार?, माजी खासदार विखेंची खासदार लंके यांच्यावर टीका!

कान्हूरपठार। नगर सहयाद्री:-  पठार भागाला पाणी मीच देणार, असे आश्वासन माजी खासदार सुजय विखे पाटील...

मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, सरकार सावध, विखे पाटील म्हणाले, आम्ही…

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने...

सासऱ्यासह पत्नीवर कोयत्याने सपासप वार; सावेडी उपनगरात दारुड्या पतीचा भयंकर कांड

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील वैदुवाडी येथे दारुच्या नशेत पती अर्जुन राजू शिंदे याने...