अहिल्यानगर | नगर सह्याद्री
गजराजनगर, काळा माथा परिसरात जुन्या वादातून सात जणांनी मिळून एका व्यक्तीवर कोयता, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी अक्षय राजेंद्र कांबळे (वय 28, रा. गजराजनगर) यांच्या तक्रारीवरून सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 21 जुलै 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता गजराजनगर फाटा, एचपी पेट्रोलपंपाजवळ सदरची घटना घडली.
किरण मांजरे, अक्षय शीरसाठ, सागर पवार, महेश उर्फ अण्णू गुंजाळ, अविनाश काळू डुकरे, आकाश अनिल डुकरे, रोहन गायकवाड आणि काही अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीचा भाऊ आकाश राजेंद्र कांबळे (वय 30) याच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. जखमी आकाश यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.