अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर तालुक्यातील नागरदेवळे येथील आलमगीर शिवारात एका ४२ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला अनुसूचित जाती-जमातीची आहे.सदरची घटना शुक्रवारी (दि. ७) दुपारी दोन वाजेच्या सुमारास ब्रम्हतळे, आलमगीर येथे घडली.
पीडित महिला आपल्या जनावरे चारत असताना आरोपी संभा परभणे (रा. कापूरवाडी शिवार) या ठिकाणी आला आणि त्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून महिलेचा विनयभंग केला. घटनेनंतर पीडित महिलेने कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली
याप्रकरणी भिगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून आरोपी अद्याप फरार आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे करत आहेत.



