spot_img
अहमदनगरभयानक घटना! १५ वर्षाच्या मुलीला ड्रग्ज दिले, नंतर...

भयानक घटना! १५ वर्षाच्या मुलीला ड्रग्ज दिले, नंतर…

spot_img

Crime News: गुजराती चित्रपटांमध्ये भूमिका देण्याचे आमिष दाखवून एका १५ वर्षीय मुलीवर दीड वर्ष अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एका २५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. स्वत:ला चित्रपट निर्माता असल्याचा त्याचा दावा असून, त्याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीने विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १ ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करून आरोपीला अटक केली.

तक्रारीनुसार, २ वर्षांपूर्वी मुलीला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट दिसली होती. त्या पोस्टमध्ये गुजराती चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या लोकांना संधी देण्याचे सांगण्यात आले होते. या पोस्टमधील संपर्क क्रमांकावर कॉल करून ती मुलगी आणि तिची आई राजकोटमधील साधू वासवानी रोडवरील आरोपीच्या कार्यालयात गेल्या. त्यानंतर आरोपीने तिला ऑडिशनसाठी बोलावले. अभिनय कौशल्य वाढवण्यासाठी सराव करावा लागेल असे सांगितले. मुलगी अभिनय चांगल्या पद्धतीने करत असेल तर तिला प्रमुख भूमिका देण्याचे त्याने आश्वासन दिले, असे एफआयआरमध्ये नमूद आहे.

एका प्रशिक्षण सत्रादरम्यान आरोपीने तिला इंटिमेट सीन करण्याची मागणी केली. त्यानंतर तिला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला. तसेच किस घेण्याचा प्रयत्न केला. मुलीने यावर विरोध केला आणि सरावासाठी जाण्यास नकार दिला. मात्र आरोपीने तिच्या आईला फोन करून पुन्हा येण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने तिला इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामाच्या नावाखाली पुन्हा कार्यालयात बोलावले. तिला वारंवार मद्यपानाचे ड्रिंक देऊन अत्याचार केला. पुढील १८ महिन्यांमध्ये त्याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला आहे.

चित्रपटांमध्ये काम न देण्याची धमकी देत आरोपीने तिला गप्प बसण्यास भाग पाडले होते. या प्रकरणी तपास अधिकारी हरेश पटेल यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध बालक लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे जप्त केले असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दिवाळीनंतर आचारसंहिता! महायुतीच्या ‘बड्या’ नेत्याने सांगितला निवडणूक आयोगाचा प्लॅन

मुंबई । नगर सहयाद्री:- लोकसभा, विधानसभेपेक्षा नेत्याची खरी निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद,...

शहरातील रस्ते घोटाळा प्रकरण पुन्हा तापले; किरण काळे यांची उच्च न्यायालयात धाव, भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत नागरिकांचा सहभाग

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कामे अर्धवट अवस्थेत...

शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; सणासुदीच्या काळात बाजारभावात घसरण

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- दसऱ्याच्या आणि नवरात्रीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर फुलांना अपेक्षित बाजारभाव मिळेल, या...

बंद घरांमध्ये सुरु असलेल्या कत्तलखान्यांवर फिरवला जेसीबी; पोलिसांची मोठी कारवाई, शहरात खळबळ..

शेवगाव । नगर सहयाद्री:- शेवगाव शहरातील खाटीक गल्ली आणि कुरेशी गल्ली येथील बंद घरांमध्ये...