spot_img
ब्रेकिंगचांदणी चौकात भीषण अपघात! अंगावर काटा आणणारं दृश्य; ब्रेक दाबताच कंटेनर...

चांदणी चौकात भीषण अपघात! अंगावर काटा आणणारं दृश्य; ब्रेक दाबताच कंटेनर…

spot_img

Accident News:चांदणी चौकात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून, एका कंटेनर ट्रकला मोठा अपघात झाला आहे. या ट्रकमध्ये बांधकामासाठी वापरले जाणारे मोठ्या प्रमाणावर लोखंडी रॉड्स होते. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, क्लीनर गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळं चौकात मोठी वाहतूक कोंडीही निर्माण झाली आहे.

ही घटना मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर घडली. ट्रक मध्ये असलेले लांब लोखंडी रॉड्स योग्य प्रकारे बांधले गेले नव्हते. ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारताच, मागील बाजूला असलेले रॉड्स जोरात पुढे सरकले आणि थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसले. यामध्ये चालक जागीच ठार झाला, तर क्लीनर गंभीर जखमी झाला आहे. ट्रक हे लांब लोखंडी रॉड्स घेऊन ते चांदणी चौकातून मुंबईच्या दिशेने निघाला होती. यावेळी अचानक ब्रेक दाबल्यानं यातील सळया किंवा लोखंडी बार हे थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसले. यामध्ये ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, ट्रक मध्ये भरलेल्या लोखंडी रॉड्स केबिनमध्ये आरपार गेले आहेत. अपघात होताच काही नागरिक आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रॉड्स इतके मोठे आणि जड होते की त्यांना हलवणे देखील कठीण झाले होते.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केलं, अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या अपघातामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळा नदीपात्रातून बेसुमार वाळूतस्करी

| देसवडे, मांडवे खुर्द, वासुंदे, पळशी परिसरात वाळूतस्करांचा उच्छाद | पोलिसांच्या नाकावर टिच्चून टाकळी...

पारनेर तालुक्यात राष्ट्रवादीला ‘अच्छे दिन’; आ. दाते यांच्या विजयानंत शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश..

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी...

आडतेबाजारातील ‘ती’ कारवाई थांबवा; पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे मागणी

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील आडते बाजार, दाळमंडई, तेलीखुंट, जुना दाणे डबरा, वंजार गल्ली, तपकीर...

सरपंच, उपसरपंचाला शिवीगाळ, ग्रामस्थावर प्राणघातक हल्ला; नगर तालुक्यातील ‘या’ गावात धक्कादायक प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- घोसपुरी (ता. अहिल्यानगर) येथील स्मशानभूमीत झाडे लावण्याच्या कामादरम्यान सरपंच किरण साळवे...