नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे आली. होमगार्डच्या भरतीसाठी मैदानात दाखल झालेल्या एक मुलीवर बलात्कार झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली. होमगार्डच्या भरती प्रक्रियेदरम्यान मैदानात धावत असताना चक्कर आल्याने मुलगी जमिनीवर कोसळली. त्यानंतर तात्काळ तिला रूग्णालयात दाखल करण्यासाठी अॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली. मात्र, अॅम्ब्युलन्स चालक आणि टेक्निशियनमधील राक्षस जिवंत झाले आणि चक्क अॅम्ब्युलन्समध्येच तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेने खळबळ उडाली असून पीडितेने तक्रार दाखल केली. 26 वर्षीय मुलीवर होमगार्ड उमेदवारावर चालत्या अॅम्ब्युलन्समध्ये बलात्कार करण्यात आला. ही घटना बिहारमधील बोधगया येथे घडली, येथील बीएमपी 3 मध्ये होमगार्ड भरती प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, भरती प्रक्रियेदरम्यान मुलीची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर तिला ताबडतोब मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेत अॅम्ब्युलन्समध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पोलिसांना दिलेल्या जबाबात पीडित मुलीने सांगितले की, अॅम्ब्युलन्समध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत होती. सध्या पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पीडित मुलगी ही इमामगंज पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. पीडितेने दिलेल्या जबाबानंतर बोधगया पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली. एसएसपी आनंद कुमार यांनी लगेचच कारवाई करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केलीये. पीडितेने आपल्या जबाबात दोनपेक्षा अधिक जण असल्याचा दावा केलाय. यामुळे याप्रकरणी अजून काही आरोपींना अटक केली जाऊ शकती. तात्काळ या प्रकरणात एसआयटीची स्थापना देखील करण्यात आली.
एसएसपी आनंद कुमार यांनी सांगितले की, घटनेच्या दोन तासांमध्येच अॅम्ब्युलन्स चालक विनय कुमार आणि टेक्निशियन अजित कुमार यांना अटक करण्यात आली. पिडितेनेच रुग्णालयात दाखल केल्यानंतर आपल्यासोबत नेमके काय घडले हे डॉक्टरांना सांगितले. याप्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. काही महत्वाच्या गोष्टी तपासात पुढे आल्या. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी अॅम्ब्युलन्समध्ये नेमके कोण कोण होते, याचा तपास घेतला जातोय. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जात आहे.