spot_img
देशभयंकर! शॉपिंग मॉलला भीषण आग, 60 जणांचा मृत्यू; अनेक जण जिवंत जळाले

भयंकर! शॉपिंग मॉलला भीषण आग, 60 जणांचा मृत्यू; अनेक जण जिवंत जळाले

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
इराकमध्ये शॉपिंग मॉलला भीषण आग लागली. या आगीमध्ये लहान मुलांसह ६० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अल-कुत शहरातील एका शॉपिंग मॉलला बुधवारी रात्री उशिरा आग लागली. अचानक भडका उडाला आणि संपूर्ण शॉपिंग मॉलला आगीने वेढा घातला. ही आग लागली तेव्हा शॉपिंग मॉलमध्ये मोठ्या संख्येने ग्राहक होते त्यांना बाहेर पडता आले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, इराकच्या अल-कुत शहरातील शॉपिंग मॉलला बुधवारी रात्री उशिरा आग लागली. या घटनेत आतापर्यंत ६० जण जिवंत जळाले. तर अनेक जण अद्यापही मॉलमध्ये अडकले आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण ही आग इतकी भीषण आहे की ती वाढतच चालली आहे. मॉलच्या बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

न्यूज एजन्सी रॉयटर्सने वासितचे गव्हर्नर मोहम्मद अल-मियाही यांनी आगीची माहिती दिल्याचा सांगितले. सोशल मीडियावर या भीषण आगीचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. काही क्षणातच ही आग शॉपिंग मॉलच्या एक-एक मजल्यावर पोहचली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहे.

महत्वाचे म्हणजे, ही आग लागली तेव्हा शॉपिंग मॉलमध्ये अनेक जण उपस्थित होते. आग लागताच एकच गोंधळ उडाला. सर्वजण आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागले पण काहींना वेळीच बाहेर पडता आले नाही. ता आगीमध्ये ६० जणांचा मृत्यू झाला अजून अनेक जण मॉलमध्ये अडकून आलेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही आतापर्यंत ५९ मृतदेहांची ओळख पटवली आहे. पण एकाचा मृतदेह पूर्णपणे जळाल्यामुळे ओळख पटवणं कठीण झाले आहे. मॉलमध्ये अजून अनेक जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे त्यांचे मृतदेह बाहर काढण्याचे काम सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. सध्या शॉपिंग मॉलला आग लागण्यामागचे कारण शोधले जात आहे. पोलिस तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रात मोठे मंत्री हनी ट्रॅपमध्ये, सभागृहात पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणाने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात...

संदीप थोरात आणखी गोत्यात; ठेवीदारांचा आक्रमक पवित्रा, पत्रकार परिषदेत मोठी माहिती उजेडात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री क्लासिक ब्रीज, मनीमॅक्सच्या माध्यमातून अनेकांना गंडा घातल्यानंतर सह्याद्री मल्टीसिटी निधी लि....

डांगे आयुक्त आहेत की भ्रष्टाचाऱ्यांचे प्रवक्ते?; किरण काळे यांचा सवाल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मनपातील 776 रस्त्यांच्या कामात झालेल्या सुमारे 350 ते 400 कोटींच्या महाघोटाळ्याच्या...

पाच दिवस पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यात मेघगर्जना होणार, मुसळधार कोसळणार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राज्यात ठिकठिकाणी येत्या 21 जुलैपर्यंत मेघगर्जनेसह, व विजांच्या कडकडाटासह हलका ते...