BJP Leader Death: राजकीय वर्तुळामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या शहर अध्यक्ष यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मोनू कल्याणे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. जुन्या वैमनस्यातून पियुष आणि अर्जुनने मोनू कल्याणेवर गोळ्या झाडल्या. सध्या दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे
रविवारी मध्यप्रदेशमधील इंदोर मधील एमजी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिमणबाग परिसरात ही घटना घडली. मोनू कल्याणे भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष होता. तसेच तो मध्यप्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचा निकटवर्तीय होता.
मोनू कल्याणे भगवा यात्रेच्या तयारीत होता. याचवेळी पियुष आणि अर्जुन नावाचे दोन युवक दुचाकीवरून चिमणबाग चौकात पोहोचले. दुचाकीवर बसून दोघेही मोनूशी चर्चा करू करत होते. अशातच दुचाकीवर मागे बसलेल्या अर्जुनने पिस्तुल काढून मोनू कल्याणे यांच्यावर गोळीबार केला. या घटनेते मोनू कल्याणे यांचा मृत्यु झाला.