spot_img
अहमदनगरगजानन कॉलनीत भयंकर प्रकार!, तलवार, कोयते अन्..

गजानन कॉलनीत भयंकर प्रकार!, तलवार, कोयते अन्..

spot_img

युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नवनागापूर येथील गजानन कॉलनीत सोमवारी सायंकाळी तलवार व कोयता घेऊन फिरत दहशत निर्माण करणाऱ्या एका 24 वषय युवकाविरोधात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिश बाळू पवार (रा. गजानन कॉलनी) असे आरोपीचे नाव असून तो सार्वजनिक ठिकाणी लोखंडी धारदार शस्त्र घेऊन फिरताना दिसून आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

ही घटना 16 जून रोजी सायंकाळी 6.25 वाजता घडली. पोलीस नाईक नवनाथ दहीफळे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सपोनि एम.बी. चौधरी व पो.ना पालवे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

आरोपीकडे असलेल्या तलवार व कोयत्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. आरोपीचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शिर्डीतील गुटख्याच्या अड्ड्यावर एलसीबीचा छापा; मुद्देमालासह आरोपी गजाआड

शिर्डी । नगर सहयाद्री जिल्ह्यात गुटखा व सुगंधीत तंबाखू विक्रीसारख्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी धडक...

ICCचा नवा फॉर्म्युला, टेस्ट क्रिकेटमध्ये होणार ऐतिहासिक बदल, टीम इंडिया मात्र…

ICC Ready for 4 Day Test Cricket News : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आल्यापासून...

स्वबळावर की महायुती याचा निर्णय आमदार घेणार?; भाजप जिल्हाध्यक्षांची पत्रकार परिषदेत माहिती

अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या दोन तृतीयांशपेक्षा अधिक जागा निवडून...

मुळा-भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून दाखल!

अकोले | नगर सह्याद्री मुळा-भंडारदरा धरणांचे पाणलोट क्षेत्रात दीर्घ प्रतीक्षेनंतर मान्सून दाखल झाला. आज, सोमवारी...