Maharashtra Crime News: नागपुरातून एक धक्कादायक आणि घृणास्पद घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील हबीबुल्ला मलिक उर्फ मामा नावाच्या भोंदूबाबावर महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी मामा नागपुरात गेल्या वीस वर्षांपासून स्थायिक असून तो मुख्यतः गरीब आणि कष्टकरी लोकांना टार्गेट करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हबीबुल्ला मलिकने कुटुंबावरील संकट दूर करण्याचा दावा करून महिलेशी ओळख वाढवली आणि घरात प्रवेश केला. त्यानंतर तो ‘मी काळी जादू जाणतो’ असे सांगत त्या महिलेला नग्न पूजा करत व्हिडिओ पाठवला. तसेच, आरोपीने महिलेसह कुटुंबीयांना जीवघेण्याची धमकी दिली.
महिलेने या वाईट अनुभवाबद्दल हिंमत दाखवून पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. तपासात हे देखील समोर आले आहे की, मामा सामान्य चहा टपरीवर थांबून लोकांच्या घरगुती समस्या ऐकत असे आणि काळी जादूचा बहाणा करून त्यांना फसवत असे.