spot_img
अहमदनगरमंत्री विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान; म्हणाले...

मंत्री विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान; म्हणाले हा सन्मान…

spot_img

लोणी / नगर सह्याद्री
आधुनिक कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या नावाने स्थापन झालेल्या मराठवाडा कृषी विद्यापीठा कडून डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देवून झालेला सन्मान खूप मोठा असून, झालेला सन्मान राज्यातील शेतक-यांना समर्पित करीत असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या २६ व्या पदवीदान समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देवून राज्यपाल डॉ.सी.पी.राधाकृष्णन् यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कृषी मंत्री आणि प्रकुलपती माणिकराव कोकाटे, मंत्री मेघना बोर्डीकर, भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक डॉ.व्ही.के.तिवारी, कुलगुरू डॉ.इंद्र मणी, केद्रीय मूल्य आयोगाचे पाशा पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कृषी विद्यापीठाने केलेल्या सन्मानाबद्दल बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, वसंतराव नाईक यांच्यामुळे राज्याला कृषी विद्यापीठाची देण मिळाली. त्यांच्या नावाने विकसित झालेल्या विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने केलेला सन्मान हा माझ्यासाठी खूप मोठा असून, राज्यातील शेतक-यांना हा सन्मान आपण समर्पित करीत असल्याचे त्‍यांनी सांगितले.

मराठवाडा कृषि विद्यापीठाने विविध क्षेत्रात केलेले संशोधन महत्वपूर्ण आहेच, पण भविष्याची गरज लक्षात घेवून आपल्या संशोधनाची दिशा आता बदलावी लागणार आहे. विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी विद्यापीठांना काम करावे लागणार असल्याचे सांगून विषमुक्त शेती निर्माण करण्याचे आव्हान आपल्या सर्वांना स्विकारावे लागणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

बांबू शेतीच्या संदर्भात पाशा पटेल यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचा उल्लेख करून ना.विखे पाटील म्हणाले की, येणा-या काळात महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याचे धोरण राज्य सरकराचे आहे. यासाठी कराव्या लागणा-या कामा करीता आजचा सन्मान पाठबळ देणारा ठरेल आशी भावना मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.

परभणी येथील कृषि विद्यापीठाच्‍या झालेल्‍या या सोहळ्यास पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना तसेच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेचे विश्‍वस्‍त उपस्थित होते. ना.विखे पाटील यांच्‍या झालेल्‍या सन्‍माना बद्दल जेष्‍ठनेते माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, जिल्‍हा बॅकेचे चेअरमन आ.शिवाजीराव कर्डील, आ.विठ्ठलराव लंघे, आ.अमोल खताळ, आ.काशिनाथ दाते, कारखान्‍याचे चेअरमन कैलास तांबे, व्‍हा.चेअरमन सतिष ससाणे, प्रवरा बॅकेचे चेअरमन भास्‍करराव खर्डे, व्‍हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे, ट्रक्‍स सोसायटीचे चेअरमन नंदू राठी, भाजपाचे कार्याध्‍यक्ष नितीन दिनकर यांच्‍यासह पदाधिका-यांनी अभिनंदन केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...

उद्धव-राज एकत्र येणार; पाच जुलैला मुंबईत..

मुंबई । नगर सहयाद्री  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा...

जामखेडमध्ये धक्कादायक प्रकार! पुन्हा एका बालकाचा मृत्यू; आठ दिवसांतील तिसरी घटना..

जामखेड । नगर सहयाद्री:- क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेसच्या लोखंडी पाईपने काढत असताना घरावरील...