HMPV virus in India:एचएमपीव्ही या व्हायरसचा भारतात पहिला रुग्ण आढळला आहे. एका आठ महिन्यांच्या बाळाला एचएमपीव्ही या व्हायरसची लागण झाली आहे. ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस असं या व्हायरसचं नाव आहे. आठ महिन्यांच्या बाळाला या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. बंगळुरुतल्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
आत्तापर्यंत या व्हायरसचे रुग्ण चीनमध्ये आढळत होते. मात्र बंगळुरुतल्या आठ महिन्यांच्या बाळाला या व्हायरसने ग्रासलं आहे. या बाळाने कुठलाही प्रवास केलेला नाही. दरम्यान या घटनेबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती देण्यात आली आहे. दरम्यान काही दिवसांपूवच अशा प्रकारच्या व्हायरसला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तसंच चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून आढळणाऱ्या या व्हायरसबाबत चिंता व्यक्त झाल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने बैठक बोलावली होती.
दरम्यान आता भारतात आठ महिन्यांच्या बाळाच्या रुपाने एचएमपीव्ही व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे.लहान मुले आणि वृद्ध लोक, तसेच एखाद्या आजाराने ग्रस्त असलेले आणि कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेले लोक एचएमपीव्ही’च्या संसर्गाच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतात. विषणूचा वाढता प्रभाव पाहाता, अधिकाऱ्यांनी लोकांना मास्क घालण्याची शिफारस केली असून, काही नवे नियम जारी केले आहेत.
ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसची लक्षणे काय आहेत?
ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) सामान्य सद आणि कोरोना व्हायरससारखी लक्षणे दर्शविते. त्यामध्ये खोकला, ताप व सद यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. कोविड-19 नंतर पाच वर्षांनंतर ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही)चा प्रादुर्भाव चीनच्या अनेक भागांमध्ये वाढत आहे, ज्यामुळे अधिकारी चिंतेत आहेत. परिणामी, अधिकारी लोकांना मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे यांसारखी खबरदारी घेण्याचे आवाहन करीत आहेत.
ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस काय आहे?
ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) हा आरएनए विषाणू आहे, जो न्यूमोव्हिरिडे कुटुंबातील मेटाप्युमोव्हायरस वंशातील आहे. 2001 मध्ये डच संशोधकांनी सर्वांत पहिल्यांदा याचा शोध लावला होता. हा विषाणू श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो. मुलांच्या नमुन्यांचा अभ्यास करताना या विषाणूचा शोध लागला होता. संशोधन असे सूचित करते की, हा विषाणू किमान सहा दशकांपासून प्रसारित आहे आणि आता जागतिक स्तरावर प्रचलित श्वसन रोगजनक म्हणून ओळखला जातो. एचएमपीव्ही प्रामुख्याने खोकताना आणि शिंकताना बाहेर काढलेल्या श्वसनाच्या थेंबांद्वारे पसरतो. संक्रमित व्यक्तींच्या जवळच्या संपर्कातून किंवा दूषित वातावरणाच्या संपर्कातूनदेखील या विषाणूचे संक्रमण होऊ शकते. चीनी सीडीडी वेबसाइट सांगते की, एचएमपीव्ही’साठी संसर्ग कालावधी तीन ते पाच दिवसांचा असतो. हा विषाणू हिवाळा आणि वसंत ऋतूच्या महिन्यांत जास्त प्रमाणात आढळतो.
राज्यात ‘एचएमपीव्ही’चा एकही रुग्ण नाही! आरोग्य विभाग
चीनमध्ये सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक सुरू आहे. राज्यात अद्याप या विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असे आरोग्य विभागाने रविवारी स्पष्ट केले. दरम्यान, एचएमपीव्हीबाबत दक्षतेसह सद-खोकल्याच्या रुग्णांच्या सर्वेक्षणाचे पाऊल आरोग्य विभागाने उचलले आहे. आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर म्हणाले, मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) श्वसन संसर्गास कारणीभूत ठरतो. हा विषाणू पहिल्यांदा नेदरलँडसमध्ये 2001 मध्ये आढळला. हा एक सामान्य श्वसन विषाणू असून, तो श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो. हा एक हंगामी साथरोग आहे आणि फ्ल्यूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. राज्यात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी श्वसनविकाराच्या संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.