spot_img
अहमदनगरहिवरे बाजार देशाला नव्हे तर जगाला दिशादर्शक ः ब्रिगेडियर डिसोझा

हिवरे बाजार देशाला नव्हे तर जगाला दिशादर्शक ः ब्रिगेडियर डिसोझा

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

हिवरे बाजार भारत देशालाच नव्हे संपूर्ण जगाला दिशादर्शक असे गाव असल्याचे प्रतिपादन ब्रिगेडीअर रुसेल डिसोझा यांनी केले. दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी एम.आय.सी. एस.चे ब्रिगेडीअर रुसेल डिसोझा यांनी आदर्श गाव हिवरे बाजारला भेट दिली. त्यांच्यासमवेत कर्नल अमन दत्ता, कर्नल सकेत रावत, कर्नल अभिषेक पटवर्धन, कर्नल बिजॉय, लेफ्टनंट कर्नल सिंह, लेफ्टनंट कर्नल प्रोहित, लेफ्टनंट कर्नल अनुराग, लेफ्टनंट कर्नल संदेश भवानी, मेजर अहुलीवालीया, मेजर मोहमद रफी, पद्मश्री पोपटराव पवार यांनी विविध विकास कामांची माहिती दिली.

भेटीप्रसंगी गावातील विकासकामे व स्वच्छता पाहून डिसोझा हे भारावून गेले. जगात अशा प्रकारचे गाव असू शकते याची प्रचीती प्रत्यक्ष हिवरे बाजार पाहिल्यानंतर आली. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले हिवरे बाजार भारत देशालाच नव्हे संपूर्ण जगाला दिशादर्शक असे गाव आहे. पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली  गावातील विविध विकास कामे झालेली पाहिल्यानंतर आदर्श नेतृत्व असल्यास गाव कसे बदलते यांचे उत्तम उदाहरण हिवरे बाजार आहे.

यशवंत माध्यमिक विद्यालयातील एनसीसी विद्यार्थ्यानी त्यांना संचलन करत मानवंदना दिली. पद्मश्री पोपटराव पवार यांनी फेटा बांधून श्रीफळ देऊन सन्मान केला. याप्रसंगी सरपंच विमल ठाणगे, सोसायटीचे चेअरमन छ्बुराव ठाणगे, व्हा चेअरमन रामभाऊ चत्तर, एस.टी. पादिर, रो.ना.पादिर, राजू सहादू ठाणगे, संदीप गुंजाळ तसेच ग्रामस्थ, पदाधिकारी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रत्येक गाव हिवरे बाजारसारखे स्वयंपूर्ण होऊ शकते
सध्या जागतिक तापमानवाढीमुळे जगाच्या समोर ज्या समस्या आहेत त्याचे उत्तर हिवरे बाजारमध्ये आहे. म्हणून देशातील परदेशातील लाखो पर्यटक हिवरे बाजारला भेटी देतात. लोकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला तर जगातील प्रत्येक गाव हे हिवरे बाजारसारखे स्वयंपूर्ण होऊ शकते असे एमआयसीएसचे ब्रिगेडीअर रुसेल डिसोझा यावेळी म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोठला झोपडपट्टीत गोमांस विक्री; छाप्यात १८० किलो मांस जप्त, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शासनाने प्रतिबंध केलेल्या गोमांस विक्रीवर तोफखाना पोलीसांनी कोठला झोपडपट्टीत मोठी...

राज्यात थंडीची लाट, तापमान १२.६ अंशांवर; कुठे किती…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात थंडीचा जोर वाढला असून, जळगाव, पुणे आणि नाशिकसह अनेक...

तयारीला लागा! महापालिका निवडणुकीची मोठी अपडेट समोर; आचारसंहिता कधी पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, पहिल्या टप्प्यातील...

बिबट्या ठार मारा; तरच चिमुकलीवर अंत्यसंस्कार, खारे कर्जुने ग्रामस्थांचा गाव बंदचा निर्णय

खारे कर्जुने ग्रामस्थांचा निर्णय | गाव बंद | शाळा, महाविद्यालय बंद | बिबट्यांनी हादरवला...