spot_img
अहमदनगरनगर शहरात Hit And Run ; मद्यधुंद ड्रायव्हरची नागरिकांना धडक, एक ठार,...

नगर शहरात Hit And Run ; मद्यधुंद ड्रायव्हरची नागरिकांना धडक, एक ठार, तिन गंभीर…

spot_img

Hit And Run: अहिल्यानगर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर शहरात हिट अँड रनची घटना घडली आहे. शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात ही घटना घडली असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर तिन जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर विरोधात कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. रविंद्र रमेश कानडे (वय 32 , राहणार कानडे मळा, सोलापूर रोड, अहिल्यानगर) असं मयताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात संध्याकाळी 7 च्या सुमारास XUV 500 कारने दुचाकी आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना धडक दिली.

या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर चौघेजण गंभीर जखमी झाले आहे. सध्या जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे तर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एमआयडीसीत टोळक्याचा तरूणावर कोयत्याने हल्ला; नेमकं काय घडलं

अहिल्यानगर | नगर सह्याद्री एमआयडीसी परिसरात एका टोळयाने तरूणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली...

ढगाळ वातावरण! कांदा उत्पादक चिंतेत; काय होणार परिणाम

श्रीगोंदा | नगर सह्याद्री श्रीगोंदा तालुयामध्ये कांदा काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. परंतु  सध्या ढगाळ...

काळजी घ्या! उष्माघाताचे ‘इतके’ रुग्ण; आरोग्य विभागाने दिला हा इशारा

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असले तरी मार्च महिन्याच्या...

चुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय, अजितदादादांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ, काय म्हणाले पहा

बीड / नगर सह्याद्री - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या वक्तव्यानंतर राष्ट्रावादी काँग्रेसचे दोन्ही गट...