spot_img
ब्रेकिंग'त्यांचे' परळी ते मुंबई बरेच लफडे!; जनआक्रोश मोर्चात मनोज जरांगेंची टीका, वाचा..

‘त्यांचे’ परळी ते मुंबई बरेच लफडे!; जनआक्रोश मोर्चात मनोज जरांगेंची टीका, वाचा..

spot_img

जालना । नगर सहयाद्री:-
धनंजय मुंडे हे कोणत्या जातीचे नाही तर सरकारचे मंत्री आहेत. धनंजय मुंडे यांचे परळी ते मुंबई बरेच लफडे आहेत. धनंजय मुंडेंना जातीयवाद निर्माण करायचा आहे. तेच प्रतिमोर्चे काढायला लावत आहे. त्यांना जातीय दंगली घडवून आणायच्या आहेत. मंत्र्यांना बोललो म्हणजे जातीला बोललो का? असा प्रश्न मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यातील विविध शहरांत मोर्चे काढले जात आहेत. शुक्रवार दि. १० जानेवारी रोजी जालना शहरात मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजीमहाराज चौकातून रिंग रोडने हा मोर्चा आंबड चौफुलीकडे निघाला होता. सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा ह्या मागणीसाठी हजारो लोकं एकत्र जमले होते. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात जरांगे देखील सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

मनोज जरांगे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी बोलो तर जातीयवाद होतो का? धनंजय देशमुख यांना तुम्ही पोलीस ठाण्यात धमकी देतात. आम्ही गुंडांवर बोलायचे नाही का? धनंजय मुंडे हे कोणत्या जातीचे नाही तर सरकारचे मंत्री आहेत. ते ओबीसीचे पांघरुण घेत आहे. मंत्र्यांना बोललो म्हणजे जातीला बोललो असं आहे का? जनता मंत्र्यांनाच बोलत असते. रस्त्यावर फिरू देणार नाही हे जनता रोषाने बोलते, असे मनोज जरांगे म्हणाले.

धनंजय मुंडेंना जातीयवाद निर्माण करायचा आहे. तेच प्रतिमोर्चे काढायला लावत आहे. त्यांना जातीय दंगली घडवून आणायच्या आहेत. आम्ही आमच्या गरीब लेकरांच्या बाजूने बोलायचे नाही का?मराठ्यांना आरक्षण मागतोय हा कोणता जातीयवाद आहे, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

ते जातीय तेढ निर्माण करत असून लाभार्थी टोळीला आमच्याविरोधात बोलायला लावत आहे. धनंजय मुंडे यांचे परळी ते मुंबई बरेच लफडे आहेत. त्यांना 25 तारखेनंतर कायदेशीर बघणार. त्यांना सांगितले होते खेटू नका ते खेटले मग आता त्यांना बघणार. ते गुंडाच्या टोळ्या सांभाळत आहेत. अशी संतप्त प्रतिक्रिया जरांगे यांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘या’ लाडक्या बहि‍णींचा जानेवारीचा हप्ताला लागणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

Ladki Bahin Yojana:महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली...

टीम इंडियाला धक्का! ‘या’ गोलंदाजाचा क्रिकेटला रामराम

Varun Aaron Retirement: भारताचा वेगवान गोलंदाज वरुण आरोनने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली...

पतसंस्थांना गंडविणाऱ्या पोपट ढवळेला बेड्या ठोकल्या!; एकाच मालमत्तेवर तीन संस्थांचे कोट्यवधींचे कर्ज

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्ह्यातील अनेक पतसंस्था पदाधिकारी, संचालक आणि व्यवस्थापक यांना हाताशी धरुन त्या...

राज्यात दारू महागणार! कारण आलं समोर..? वाचा..

मुंबई। नगर सहयाद्री:- राज्याचा महसूल वाढवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महसूल वाढीसाठी दारुवरील...