अहिल्यानगर । नगर सहयाद्री
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्वाची टोकाची भूमिका मांडली आहे. कोणत्याही परिस्थितीत भूमिकेशी तडजोड करणार नाही अशी भूमिका घेणार्या आमदार जगताप यांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाज अहिल्यानगर व सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने अहिल्यानगर शहरात माळीवाडा बसस्थानक येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर रविवारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याची हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्यात हभप संग्रामबापू भंडारे, सागर बेग, गोरक्षक शिवशंकर स्वामी, अविनाश सारंगधर तायडे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. आमदार संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्वाची भूमिका मांडली आहे.
त्यांनी अहिल्यानगरमधील सिद्धटेक, शनिशिंगणापूर, मढी, जवखेडे खालसा, अक्कलकोट येथे जाऊन हिंदुत्वाची भूमिका मांडली. त्यामुळे काही समाजांतील लोक आमदार जगताप यांच्या विरोधात रस्त्यावर येत आहेत. संविधान मान्य नसणारे लोक आमदार जगताप यांच्या भूमिकेला विरोध करीत आहेत. त्यांना उत्तर देण्यासाठी आणि आमदार जगताप यांच्या समर्थनार्थ… हिंदू धर्मासाठी रविवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यासाठी हिंदू धर्मीयांनी उपस्थित राहवे असे आवाहन करण्यात आले आहे.
धर्मासाठी एक व्हा…
आमदार संग्राम जगताप यांनी जिहादी वृत्तीच्या लोकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याच जिहादी लोकांनी आमदार जगताप यांच्या विरोधात षडयंत्र रचले आहे. त्या जिहादी लोकांना उत्तर देण्यासाठी सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने रविवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदुत्वासाठी आणि आपल्या धर्मासाठी एक व्हा… एक तास हिंदुत्वासाठी… एक तास धर्मासाठी… द्या असे आवाहन हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. या मेळाव्यानिमित्त अहिल्यानगर शहरात मोठी गर्दी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्ताची तयारी ठेवली आहे.