spot_img
ब्रेकिंगनगरात राडा!! 'येथे' माझी दादागिरी चालते तुला..; 'व्यापाऱ्याला' टोळक्याकडून बेदाम मारहाण

नगरात राडा!! ‘येथे’ माझी दादागिरी चालते तुला..; ‘व्यापाऱ्याला’ टोळक्याकडून बेदाम मारहाण

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
‘तुला येथे धंदा करून देणार नाही, येथे माझी दादागिरी चालते असे म्हणून सहा जणांच्या टोळक्याने व्यापाऱ्याला मारहाण केली. दुकानातील वस्तूंची तोडफोड करून नुकसान केले असल्याची घटना हातमपुराच्या धरती चौकातील वर्धमान ट्रेडर्स दुकानात घडली. अशोक प्रेमराज चंगेडे (रा. हातमपुरा) असे मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

अजय अशोक चगेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार सुंदर देठे (रा. घरती चौक, नगर), पियुष शाम साठे, खुर्य्या उर्फ आकाश राम कोरे, चंद्रकांत उजागरे (पूर्ण नाब माहिती नाही), अक्षय ऊर्फ स्वप्नील राजेंद्र शिंदे, योगेश राजेंद्र कसबे (सर्व रा. कोठी, स्टेशन रस्ता, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. फिर्यादी यांचे वर्धमान ट्रेडर्स होलसेल टायर्स नावाचे दुकान धरती चौक, हातमपुरा येथे आहे. बुधवारी (दि. २०) दुपारी फिर्यादीचे बडिल अशोक चंगेडे दुकानाबर होते. त्यावेळी तुषार देठे व इतर पाच जण तेथे आले. त्यांनी अशोक यांना लाकडी दांडक्याने व हाताने मारहाण केली.

चंद्रकांत उजागरे याने ‘तुला येथे धंदा करून देणार नाही, येथे माझी दादागिरी चालते’ अशी धमकी दिली. शिवीगाळ, दमदाटी करून दुकानातील वस्तूंची तोडफोड करून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून मुलीसमोरच आईची केली हत्या

अकोला / नगर सह्याद्री - अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या...

मुली गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका हो!:गौरी गर्जेच्या वडिलांनी फोडला टाहो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या...

सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपला; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन

मुंबई । नगर सहयाद्री :- धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही...

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; प्रशासनाकडून हिरवा कंदील, आता डबल गिफ्ट मिळणार?

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया...