पारनेर | नगर सह्याद्री
रयत शिक्षण संस्थेच्या कान्हूरपठार येथील शाळेत झालेल्या प्रकारात कोणालाही पाठीशी घातले नाही. स्कुल कमिटी सदस्य म्हणून काम करताना यापूर्वीच्या सदस्यांपेक्षा मोठे योगदान देण्याचे काम केले. खा. निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या शाळेला भरीव निधी मिळवून दिला आणि स्वत: देखील योगदान दिले. शाळेत शिकणाऱ्या मुलांचे पालक हेच स्कुल कमिटी मध्ये असावेत अशी मागणी प्रामुख्याने शाळेत झालेल्या आंदोलनानंतर पुढे आली. त्या पालकांचा आदर ठेऊन मी माझ्या स्कुल कमिटी सदस्याचा राजीनामा देत असल्याची घोषणा जनता विद्या मंदिरचे स्कुल कमिटी सदस्य चंद्रभान ठुबे यांनी आज केली.
यासंदर्भात प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात चंद्रभान ठुबे यांनी म्हटले आहे की, दोन वर्ष या कमिटीवर माझे नेते खासदार निलेश लंके यांच्या शिफारशीने निवड झाल्यामुळे काम करता आले. सदस्य म्हणून काम करत असताना माझ्यावर काहींनी आरोप केले मी ठराविक शिक्षकाला पाठीशी घातले किंवा काहींच्या तक्रारी केल्या. मात्र, मी सदस्य असताना मी कधीही कोणाची बदली करा म्हणून सिंगल अर्ज संस्थेच्या कोणत्याही कार्यलयात दिला नाही. शाळेत पालकांच्या तक्रारीनंतर जे आंदोलन केले होते ते आंदोलन त्या वेळेस बदल्या झालेल्या चार शिक्षकांसाठी केले होते. त्या वेळेस आधीच 6 शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या. त्यात परत चार बदल्या झाल्या होत्या हे त्या आंदोलनामागील खरे कारण होते.
माझ्यावर काही आरोप झाले त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. झालेले आरोप पुराव्या नुसार सिद्ध करून दाखवावे. सार्वजनिक जीवनात काम करत असताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्षपद, भारतीय जनता युवा मोर्चाचे उपजिल्हाअध्यक्षपद तसेच तालुका पातळीवर वीज वितरण समितीचे तालुकाध्यक्षपदी काम केले. कोरठण खंडोबा देवस्थान ट्रस्टवर 8 वर्षांपासून विश्वस्त म्हणून व आता सचिव म्हणून काम करतोय. या सर्व ठिकाणी पारदश काम केले असून माझ्या कामाचा ठसा देखील उमटवलाय. माझ्या कामाची पद्धत बघून खासदार लंके यांनी माझ्या आग्रही मागणीचा विचार करून गरीब विध्यार्थ्यांना अभ्यास करता यावी म्हणून एक कोटी रुपयांची अभ्यासिका देखील दिली. या अभ्यासिकेत अभ्यास करून काही मुले सरकारी नोकरीत दाखल झालेत तर काही अंतिम टप्यात आहेत.
मी चंदा देणारा आहे घेणारा नव्हे!
शाळेतील आंदोलनानंतर एका महाशयांनी सोशल मीडियावर आरोप केला की, सदस्यांना शिक्षकांकडून चंदा मिळतो का? बाकीच्या सदस्यांना मिळतो का हे माहित नाही. पण मी चंदा देणारा आहे घेणारा नाही हे लक्षात घ्या. सदस्य म्हणून व त्याआधीही शाळेत ज्या साठी स्कुल कमिटी आहे, त्यामाध्यमातून काम करताना 2013 पासून 2024 पर्यंत प्रत्येक कर्मवीर जयंतीला विध्यार्थ्यांना अल्पोपहारासाठी दरवष मी 8 ते 10 हजार रुपये खर्च करतो. सर्व विध्यार्थ्यांना 800 चित्रकलेच्या वह्या, 2017 मध्ये ग्रीन इन्फ्रा मधून शाळेसाठी डिजिटल रूम व जलशुद्धीकरण प्रकल्प किंमत 6 लाख रुपये, 2019 मॅरेथॉन स्पर्धेसाठी ट्रॉफीज, तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनासाठी ट्रॉफीज, शाळेच्या बांधकामासाठी 21 हजार रुपये देणगी, प्रत्येक वर्गात ठेवण्यासाठी डस्टबिन, मुलींच्या स्वछतागृहासाठी पाच हजार रुपये वर्गणी, आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून 70 सायकल व शालेय साहित्य, आ. सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून संगणक, 1994 बॅचच्या माध्यमातून 65 हजारांचा इमारत निधी, जिल्हा पातळीवर निवड झालेल्या खेळाडूंना टी शर्ट्स आणि अनेक विध्यार्थ्यांना फि भरण्यासाठी पैसे आणि पुस्तके घेण्यासाठी मदत केली असल्याचेही चंद्रभान ठुबे यांनी सांगितले.