अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जेएलपी टॉवर लिंक रोड, भूषणनगर तू गहिले दूध डेअरी दरम्यान अवजड व जड वाहनांना रहिवासी कॉलनीतून जाण्यास बंदी आहे. परंतु, चुकीच्या ठिकाणी बॅरिकेट टाकल्याने अवजड वाहतुकीमुळे साईदीप सोसायटी व नवोदय कॉलनीतील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. बॅरिकेट रस्ता सुरु होतो त्याच ठिकाणी टाकून अवजड वाहतूक बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा पावित्रा नागरिकांनी घेतला आहे.
इंडस्ट्रीयल इस्टेट ते लिंक रोड हा कॉक्रिटचा रस्ता झाला आहे. परंतु, जेएलपी टॉवर लिंक रोड, भूषणनगर तू गहिले दूध डेअरी दरम्यान अवजड व जड वाहनांना रहिवासी कॉलनीतून जाण्यास बंदी घातली आहे. तसा आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी काढला आहे. अवजड वाहतूक हाऊ नये यासाठी रस्त्याला बॅरिकेट उभे करण्यात आले आहे. परंतु, बॅरिकेट रस्ता सुरु होतो त्या ठिकाणी लावणे अपेक्षित असतांना काही ठेकेदार व बिल्डर यांची मज राखण्यासाठी रस्ता सुरु झाल्यापासून 200 फूट अंतरावर टाकले आहे. त्यामुळे अवजड वाहतूक साईदीप सोसायटी, नवोदय कॉलनीतून होत आहे. याचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
रोड सुरु होतो त्या ठिकाणीच बॅरिकटे टाकावे अन्यथा तीव्र आंदोलन करणार
केडगामध्ये जेएलपी टॉवर लिंक रोड, भूषणनगर तू गहिले दूध डेअरी दरम्यान अवजड व जड वाहनांना रहिवासी कॉलनीतून जाण्यास बंद घातलेली आहे. तसेच अवजड वाहतूक बंदीसाठी बॅरिकेट टाकले आहे. परंतु ते बॅरिकेट रोड सुरु होतो त्या ठिकाणी ठाकणे अपेक्षित असतांना 150-200 फूट अंतर आत बॅरिकेट टाकले आहे. त्यामुळे बॅरिकेट टाकण्याच्या अगोदर असलेल्या रस्त्याने इतर कॉलनीमधून अवजड वाहतूक होत आहे. याचा लहान मुलांसह नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रोड सुरु होते त्या ठिकाणीच अवजड वाहतूक बंदसाठी बॅरिकेट टाकावे अशी मागणी साईदीप सोसायटी व नवोदय कॉलनीतील नागरिकांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.



