spot_img
अहमदनगरभारीच! 8 वी पास शेतकऱ्याने लावला 'या' पिकाचा जुगाड? मिळतोय जबरदस्त नफा..

भारीच! 8 वी पास शेतकऱ्याने लावला ‘या’ पिकाचा जुगाड? मिळतोय जबरदस्त नफा..

spot_img

नगर सहयाद्री टीम-
शेतीमध्ये अनेक शेतकरी आता नवनवीन तंत्रे वापरत आहेत. तंत्रज्ञाचा वापर आता शेतीत देखील होऊ लागला आहे. त्यामुळे आता अगदीच अचंबित करणारे प्रयोग शेतात होऊ लागले आहेत. अशाच एका तंत्राच्या साहाय्याने 8 वी पास असणाऱ्या एका शेतकऱ्याने लाल मुळ्याची लागवड केली अन त्यातून जबरदस्त नफा मिळवला आहे.

बहुतेक लोक पांढर्‍या मुळ्याची लागवड करत असतात. त्यामुळे लाल मुळ्याची लागवड हा विषयच अनेकांना आश्चर्यचकित करू शकतो. संबंधित शेतकऱ्याचा कृषी विद्यापीठाच्या उपक्रमात नेहमीच सहभाग असायचा. त्यांनी कृषी शास्त्रज्ञांची भेट घेत लाल मुळा पिकवण्याची कल्पना अवघत केली.

लाल मुळ्याच्या लागवडीसाठी त्यांनी बरीच पुस्तके वाचली आणि कृषी संशोधकांना भेटले. यानंतर, दोन कलमे मिसळून एक रोप तयार केले. त्याचे जीर्ण पद्धतीने बी तयार केले. सतत थंडीच्या दिवसात चार वर्षे पेरणी केली. त्यात दरवर्षी सुधारणा होत गेली. अन आता परिपूर्ण असे रोप तयार झाले.

या नवीन प्रकारच्या मुळ्यामधे चवीत कोणतीही कमतरता नाही. या मुळ्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स आढळतात. त्याचे बियाणेही तयार केले जात आहे, जेणेकरून त्याचे उत्पादन वाढवता येईल. बाजारात सामान्य मुळा 20 ते 30 रुपये किलोने विकला जातो. तर या लाल मुळ्याला 100 रुपये किलो भाव मिळत आहे. काही मोठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट त्यांच्याकडून हा मुळा घेत आहे त्यामुळे त्यांना जबरदस्त नफा प्राप्त होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अक्षय कर्डिलेंना जिल्हा बँकेत तोच न्याय मिळणार का?

अहिल्यानगर / नगर सह्याद्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर जिल्ह्याच्या राजकारणासह जिल्हा बँकेत...

..आता दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे, अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्याविरोधात आता एल्गार पुकारला आहे. विरोधकांनी रस्त्यावर उतरून...

संतापजनक! रुग्णवाहिकेत आशा वर्करसोबत भयंकर घडलं, रात्री परतताना चालकाने केलं असं काही..

Maharashtra Crime News : महिलांचा लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना अजूनही थांबत नाहीत. अशात सहकाऱ्याकडूनच...

हवामान खात्याची महत्वाची अपडेट, काय दिला इशारा?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून...