spot_img
ब्रेकिंगपावसाचं जोरदार कमबॅक; मुंबई, ठाण्याला ‘ऑरेंज अलर्ट’, पुढचे ३ दिवस महत्वाचे

पावसाचं जोरदार कमबॅक; मुंबई, ठाण्याला ‘ऑरेंज अलर्ट’, पुढचे ३ दिवस महत्वाचे

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यभरात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई आणि ठाण्यासाठी 16 आणि 17 ऑगस्टला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर रायगडसाठी आज (16 ऑगस्ट) रेड अलर्ट देण्यात आला आहे.

काल रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असून, सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पावसाच्या तडाख्यात विक्रोळीत दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर धाराशिवमध्ये तेरणा डॅम ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटकांची गर्दी उसळली आहे.

मुंबई-ठाण्यात पावसाचा कहर
मुंबईत शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शनिवारी सकाळीही जोर कायम ठेवला. अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. हवामान खात्याने मुंबई आणि ठाण्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आज दहीहंडीचा उत्सव साजरा होत असला तरी पावसाचा जोर आणि कालावधी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालघरमध्ये रविवारपासून (17 ऑगस्ट) पाऊस आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, 19 ऑगस्टपर्यंत हा जोर कायम राहील.

रायगडला रेड अलर्ट, कोकणातही धोक्याची घंटा
रायगडसाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, रायगड आणि रत्नागिरीत मंगळवारपर्यंत (19 ऑगस्ट) जोरदार पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे आणि मुंबईसाठी शुक्रवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला होता, परंतु पावसाचा जोर पाहता आता प्रशासन सतर्क झाले आहे. कोकणातील डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे, तर सखल भागात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.

विक्रोळीत दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू
मुंबईच्या विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात मुसळधार पावसामुळे शनिवारी पहाटे 2:30 वाजता दरड कोसळली. या दुर्घटनेत मिश्रा कुटुंबातील सुरेश मिश्रा (वय 50) आणि त्यांची मुलगी शालू मिश्रा (वय 19) यांचा मृत्यू झाला. सुरेश यांच्या पत्नी आरती (वय 45) आणि मुलगा ऋतुराज (वय 20) गंभीर जखमी असून, त्यांच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अग्निशमन दल आणि पालिकेच्या पथकांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले असून, परिसरातील इतर रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. पालिकेने यापूर्वीच हा भाग धोकादायक घोषित केला होता, परंतु पुनर्वसनाच्या अभावामुळे अनेक कुटुंबे येथे राहत होती.

धाराशिवमध्ये तेरणा डॅम ओव्हरफ्लो
दुसरीकडे, धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तेरणा डॅम ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे डॅमवर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. सुट्टीच्या दिवशी कुटुंब आणि तरुणवर्ग डॅम पाहण्यासाठी येत असले तरी, प्रशासनाकडून पुरेशा सुरक्षाव्यवस्थेचा अभाव दिसून येत आहे. डॅमवरील अरुंद पूल आणि मोठा पाण्याचा प्रवाह यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धर्माच्या नावाखाली… ; घुलेवाडी येथील घटनेवर बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले?

संगमनेर / नगर सह्याद्री घुलेवाडी सप्ताह जे घडले ते तालुक्यातील जनतेने समजून घेतले पाहिजे....

दारू पिण्याची शर्यत बेतली जीवावर; एकाचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री - सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे रविवारी (१७ ऑगस्ट) घडलेल्या...

नगरमध्ये देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांनी असा लावला सापळा

कृष्णा लॉजवर छापा | तिघांविरुद्ध गुन्हा अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरातील बुरुडगाव रोडवरील कृष्णा लॉजवर कोतवाली...

पारनेरमध्ये बिबट्याचा हैदोस, कुठे घडला प्रकार पहा

निघोज | नगर सह्याद्री बिबट्याचा निघोज, गुणोरे, गाडिलगाव, कुंड, खंडोबा पाऊतके परिसरात हैदोस सुरू असून...