spot_img
अहमदनगरसुपा परिसरात अतिवृष्टी: 'तो' रस्ता दहा तास बंद, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, वाचा...

सुपा परिसरात अतिवृष्टी: ‘तो’ रस्ता दहा तास बंद, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, वाचा सविस्तर

spot_img

सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील सुपा, वाळवणे, रायतळे, अस्तगाव, पिंपरी गवळी, रांजणगाव मशीद, आपधूप, बाबुड, कडूस, पळवे खुर्द, पळवे बुद्रुक, जातेगाव, घाणेगाव, गटेवाडी, म्हसणे सुलतान, मुंगशी, हंगा, नारायणगव्हाण, वाडेगव्हाण या गावात गेले आठ दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सोमवार दि.22 रोजी रात्री 11 ते मंगळवार दि. 23 रोजी सकाळी 9 च्या दरम्यान ढगफूटी सदृश पाऊस झाला. बेसुमार झालेल्या पावसाने पारनेर – विसापूर रस्त्यावर बाबुड येथील बस क्रमांक 1 वरील पुलावरून जोराचे पाणी वाहत असल्यामुळे सुमारे 10 तास रस्ता बंद होता. यामुळे ग्रामस्थ, विद्याथ, औद्योगिक वसाहतीमधील कामगार, दुध उत्पादक शेतकरी यांचे प्रचंड हाल झाले. सकाळी ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहायाने पुलाच्या मोरया मोकळ्या केल्यानंतर व पाणी कमी झाल्यानंतर रस्ता सुरु करण्यात आला.

तालुक्यातील नारायणगव्हाण व वाडेगव्हाण परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांची शेतातील उभी पिके भुईसपाट झाली आहेत. स्थानिकांनी माहिती देताना सांगितले की आठ ते दहा वर्षातील सर्वात मोठा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे ओढ्यांना पूर आला तसेच शेती पिकांचे, शेतीच्या बांधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतातील माती वाहून गेली आहे. गेल्या आठ ते दहा वर्षातील सगळ्यात मोठा पाऊस बरसल्याने आनंद व्यक्त करावा की शेतीच्या नुकसानामुळं चिंता व्यक्त करावी, अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.

पावसाने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे सर्व शेतकऱ्यांची दैणा उडाली आहे. या पावसात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.सुपा परिसरातील गावात मागील 7 ते 8 दिवसांपासून सातत्याने पाऊस होत असल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पुलाची उंची वाढवा!
गेली आठ दिवसांपासून सुपा परिसरात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. आठ दिवसातून बाबुड येथील बस क्रमांक 1 येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा रस्ता बंद होता. सोमवार दि. 22 रोजी झालेल्या मुसळधार पावसाने देखील हा रस्ता 10 तास बंद होता. यादरम्यान ये- जा करणाऱ्या प्रवाशी व विद्यार्थ्यांचे हाल झाले. या पुलाची उंची जमिनीलगत असल्यामुळे साधारण पावसात देखील हा रस्ता तासंतास बंद रहातो. यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जैन मंदिर: काळे यांचे पुण्यात धरणे आंदोलन; ताबा न सोडल्यास प्राणांतिक उपोषण करणार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरमध्ये श्री ऋषभ संभव जीन जैन श्वेतांबर संघ (जैन मंदिर) ट्रस्टचा...

बदनामी केली..; किरण काळे यांच्यावर कारवाई करा; पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना कोणी दिले निवेदन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाच्या कापड बाजार अहिल्यानगरच्या...

आघाडी, युतीचे चित्र धुसर…; स्थानिक आघाड्यांना प्राधान्य

नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी राजकारण तापले | वरिष्ठांकडून आदेश मिळेना अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- अहिल्यानगर...

बोगस दस्त नोंदवून फसवणूक प्रकरण; अंजुम शेख, डावखर, इंगळेंसह सात जणांविरुध्द गुन्हा दाखल

श्रीरामपूर | नगर सह्याद्री वारसा हक्कातील जमिनीच्या वादातून श्रीरामपुरात कोट्यवधी रुपयांचा बोगस दस्त नोंदवून, फसवणूक...