spot_img
अहमदनगरनगर तालुक्यात मंगळवारी अतिवृष्टी; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आ.दाते यांनी साधला संवाद, काय म्हणाले...

नगर तालुक्यात मंगळवारी अतिवृष्टी; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आ.दाते यांनी साधला संवाद, काय म्हणाले पहा..

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
नगर तालुक्यातील खडकी, अकोळनेर, सारोळा कासार येथे मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास अतिवृष्टी झाल्यामुळे नुकसान झालेल्या भागातील नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश आ. काशिनाथ दाते यांनी दिले आहे. मंगळवारी दुपारी झालेल्या अतिवृष्टीमुळे या गावांमध्ये पुर परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतात व घरामध्ये पाणी गेले आहे शेत जमीन व शेती पिके वाहून गेल्यांने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरांचे लहान मोठ्या स्वरूपात नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आमदार काशिनाथ दाते सर यांनी संवाद साधत व्यथा जाणून घेऊन आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे असा धीर शेतकऱ्यांना देत नुकसानग्रस्त भागाची पाहणी आमदार कशिनाथ दाते यांनी केली. अतिवृष्टीमुळे खडकी, अकोळनेर, सारोळा कासार परिसरात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात कांदे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली जनावरे, शेळया, मेंढ्या, गोठा, पत्रे पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले आहे.

गावातील रस्ते, पुल, बंधारे वाहून गेले आहेत तर वीज वितरण व्यवस्थेचे देखील मोठे नुकसान झाले. अनेकांच्या घराचे पत्रे उडून संसार उघड्यावर आले आहेत. खडकी परिसरात झाडे उन्मळून पडली आहे. कांदा, टॉमॅटो, बिजली, झेंडु यासह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विजेचे पोल पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.

मदतीसाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार
खडकी, अकोळनेर, सारोळा कासार या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे ओढ्या नाल्यांचे पाणी घुसून अथवा पाणी साठून ज्या पिकांचे अथवा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तेथे तहसीलदारांनी खात्री करून पंचनामे करावेत अशा सूचना केलेल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे
-आमदार कशिनाथ दाते

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

पारनेर । नगर सहयाद्री:- वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी...