spot_img
अहमदनगरचार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग! निळवंडेत ३६ टक्के तर भंडारदरा धरणात 'इतका'...

चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग! निळवंडेत ३६ टक्के तर भंडारदरा धरणात ‘इतका’ पाणीसाठा

spot_img

अकोले | नगर सह्याद्री
भंडारदरा धरण परिसरात गत चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने धरणात गत 24 तासांत नव्याने 399 दलघफू पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा सायंकाळी 4101दलघफू (37.15टक्के) झाला होता. सुरू असलेला पाऊस आणि होणारी पाण्याची आवक लक्षात घेता हा पाणीसाठा 40 टक्क्‌‍यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, निळवंडे धरणातीलही पाणीसाठा वाढत असून हे धरणही 36 टक्के भरणार आहे. 24 तासांत धरणात नव्याने 760 दलघफू पाणी दाखल झाले. सकाळी पाणीसाठा 3994 दलघफू होता. तर निळवंडेत 238 दलघफू पाणी आले. आढळा पाणलोटातही जोरदार पाऊस होत असल्याने 96 दलघफू पाणी दाखल झाल्याने काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा काल सकाळी 675 दलघफू झाला होता. ायंकाळी तो 701 दलघफूवर पोहचला होता.

गत तीन दिवसांपासून पाणलोटात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. त्यामुळे दोन दिवसांत भंडारदरात विक्रमी नवीन पाण्याची आवक झाली. या दोन दिवसांच्या तुलनेत काल शुक्रवारी पावसाचे प्रमाण काहीसे कमी होते. पण पाण्याची आवक जोमाने सुरू आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा आज 40 टक्क्‌‍यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात पाण्याची आवक घटली आहे. काल सकाळी मुळा धरणात 6 हजार 951 क्युसेकने आवक सुरू होती. ती सायंकाळी पावसाने उघडीप दिल्याने 2 हजार 247 (कोतूळ इनफ्लो) क्युसेकसवर आली.

धरणाची पातळी काल दिवसभर धरणाच्या पाणी पातळीत 709 दलघफू ची वाढ झाली. सकाळी धरणाचा साठा 9 हजार 494 दलघफू होता. तो वाढून सायंकाळी 10 हजार 203 दलघफू इतका झाला. गुरूवारी रात्री कोतूळ 44 मि.मी. तर मुळाडॅम 04 मि.मी. पावसाची नोंद झाली.दारणाच्या व गंगापूर च्या पाणलोटातील मुसळधार पावसामुळे दारणा 62 टक्क्‌‍यांवर तर गंगापूर 65 टक्क्‌‍यांवर पोहचले. दारणा, गंगापूर तसेच कडवा व पालखेड मधुन सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातुन जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत काल सकाळी 6 वाजता 29307 क्युसेक ने विसर्ग करण्यात येत होता. पावसाचा जोर ओसरल्याने हा विसर्ग काल सायंकाळी 9465 क्युसेकवर आला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सुपा एमआयडीसीत कंपनीने केला विश्वासघात! 150 युवकांना नोकरीच्या नावाखाली फसवले

सुपे MIDC मधील GMCC कंपनीत 150 युवकांवर अन्याय../ पारनेर भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मनोज...

देवेंद्रजी, नगरमध्ये बीडीओच लाचखोर निघाला हो!

मिनी मंत्रालय झाले अधिकाऱ्यांचे चरण्याचे कुरण | आनंद भंडारी यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा परिषद- पंचायत...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार बिनव्याजी कर्ज..

मुंबई । नगर सहयाद्री राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मोठा दिलासा...

केडगावात विजेचा लपंडाव! माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिला इशारा; ‌‘वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा… ’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगराचा गेल्या एक महिन्यापासून विजेचा लपंडाव चालू असल्यामुळे सर्वत्र अंधाराचे...