पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील टाकळी ढोकेश्वर, वासुंदे, वडगाव सावताळ आणि तिखोल या गावांमध्ये सोमवारी मध्यरात्री व सकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ओढे-नाल्यांना पाणी वाहू लागले. मात्र, या पावसाने साठवणुकीसाठी ठेवलेल्या कांदा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले, ज्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.तालुक्याच्या उत्तर भागात सध्या पावसाचा जोर वाढला असून, कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात साठवणुकीत आहे. पावसामुळे कांद्याला ओल लागून सडण्याची भीती निर्माण झाली आहे.
यंदा कांदा उत्पादन चांगले झाले असले, तरी पावसाच्या संकटाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. स्थानिक शेतकरी सांगतात की, कांद्याचे भाव आधीच कमी असताना आता नुकसानीमुळे आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना सुरू केल्या आहेत, परंतु सततच्या पावसामुळे त्यांना मर्यादा येत आहेत.कृषी विभागाने शेतकऱ्यांना साठवणुकीसाठी योग्य व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे. तालुक्यात पुढील काही दिवस पाऊस कायम राहण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाने सुचवले आहे.
पारनेर तालुक्यात शेतकरी चिंतेत
पारनेर तालुक्यात अचानक कोसलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे. वडगाव सावताळ, टाकळी ढोकेश्वर व वासुंदे परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा पीक मोठ्या प्रमाणात साठवले होते. अचानक कडाडलेलया जोरदार पावसामुळे या पिकाचे नुकसान झाले असनू तात्काळ पिकांचे पंचनामे करण्यात यावे.
– शिवाजी रोकडे (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप किसान मोर्चा)