spot_img
अहमदनगरपारनेर-नगरमध्ये दमदार पाऊस; पंजाबराव डख म्हणतात ३० मे पर्यंत धो धो...

पारनेर-नगरमध्ये दमदार पाऊस; पंजाबराव डख म्हणतात ३० मे पर्यंत धो धो…

spot_img

सुपा | नगर सह्याद्री

पारनेर तालुक्यात शुक्रवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह सर्वदूर दमदार पाऊस झाला असुन यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी दुपारी पारनेर तालुयातील बहुतांशी भागात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी ओढे नाले वाहते झाले असून कडक ऊन्हाळ्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा असल्याने पारनेर तालुक्यात अनेक ठिकाणी पाण्याने तळ गाठला आहे. अशातच गेल्या दोन तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पाण्याबाबत दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत होती. दुपारी एक नंतर आकाश झाकोळून गेले होते. दुपारी दोन नंतर हलया स्वरूपात पावसात सुरुवात झाली. सुरुवातीला शांत पडत आसलेल्या पावसाने नंतर गिअर बदलत विजांच्या कडकडाटाला सुरवात झाली.  अशातच जोराचा वाराही सुटला व नंतर पावसाने वेग  घेतला  जवळजवळ एक तास जोराचा पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा वेग कमी झाला असला तरी सायंकाळी उशिरापर्यंत अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडत होता.

मोसमी पावसाला अवकाश असला तरी हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार १५ ते ३० मे दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे. गेल्या दोन तीन दिवसांत तालुयात अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. त्याचे  प्रमाण थोडे असले तरी शुक्रवारी मात्र वादळी वार्‍यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला.  यात अनेक ठिकाणी ओढ्यानाल्यांना पाणी आले. छोटेमोठे बंधारे पाण्याने भरले होते.

शुक्रवारी झालेल्या वादळी पावसाने  कांदा व आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या कांदा काढणी चालू आसल्याने रानामाळात कांदा पडलेला आहे. काही ठिकाणी बळीराजा साठविण्यासाठी कांदा गोळा करत आहे. अशातच जोराचा पाऊस झाल्याने झाकपाक करताना शेतकर्‍यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. वादळी वार्‍यामुळे तोडणीला आलेल्या कैर्‍या मोठ्या प्रमाणात पडल्या आहेत. हा पडलेला पाऊस हंगामाच्या १५ दिवस आगोदर पडत असला तरी शेतीच्या पूर्व मशागतीसाठी फलदायी आहे. या पावसावर शेतकरी चारा पिके घेण्यास सुरुवात करताना दिसत आहेत.

३० मे पर्यंत धोधो पाऊस ः पंजाबराव डख
शेतकर्‍यांनी शेतीची कामे जितका वेळ मिळेल तितया वेळेत लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या प्रयत्न करावा. संपूर्ण राज्यामध्ये १५ मे ते ३० मे पर्यंत पावसाळ्यासारखा धो-धो पाऊस पडणार आहे. हा पाऊस पूर्व आणि पश्चिम विदर्भ तसेच दक्षिण महाराष्ट्र, कोकणपट्टी तसेच खानदेश, मराठवाडा म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पडणार असल्याचे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख त्यांनी म्हटले. इतकेच नाही तर उन्हाळ्यात आजपर्यंत कधीही इतका पाऊस पडला नाही इतया प्रमाणात यावेळेस पाऊस पडणार असल्याचे देखील त्यांनी अंदाज वर्तवताना म्हटले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही दमदार पाऊस होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० हजार जमा होणार? मे-जूनचा हप्ता एकत्र येणार…?, वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला...

हॉटेल चालकानी तरूणीला संपवल!, बड्या नेत्याच्या गावात ‘धक्कादायक’ प्रकार

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या तरुणीची हत्या करून मृतदेहाची...

आजचे राशी भविष्य! सोमवार ‘या’ राशींसाठी लाभदायक महादेवाची कृपा..!, तुमची रास काय?

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल,...

जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या तीन ठिकाणी एलसीबीचे छापे; १७ गोवंशीय जनावरांची सुटका

कर्जत | नगर सह्याद्री जिल्ह्यातील कर्जत शहरात कत्तलीसाठी तीन ठिकाणी डांबून ठेवलेल्या गोवंशीय १७ जनावरांची...