spot_img
अहमदनगरनगर जिल्ह्यात चार दिवस मुसळधार! 'या' गावातील शेतीला आले तळ्याचे स्वरूप

नगर जिल्ह्यात चार दिवस मुसळधार! ‘या’ गावातील शेतीला आले तळ्याचे स्वरूप

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री:-
शुक्रवारी सायंकाळी शनिवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे साकत परिसरातील नदी, ओढ्यांनी रौद्र रूप धारण केले होते. यामुळे अनेक वाड्या व वस्त्यांचा संपर्क तुटला होता. तसेच शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पीके पाण्याखाली गेले आहेत. साकत कोल्हेवाडी कडभनवाडी जोडणारा लेंडी नदीवर असलेला पुल आज झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेला यामुळे लोकांचा संपर्क तुटला होता सकाळी आठ वाजता काही लोकांना जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. तसेच अनेक विद्यार्थ्यांना परत माघारी जावे लागले. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. लवकरात लवकर पुलाची उंची वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सध्या जामखेड सौताडा महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. यातच सौताडा जवळील पूल काही दिवसांपूर्वी वाहून गेला होता. तसेच रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्ता वाहतुकीस योग्य नाही त्यामुळे अनेक वाहनधारक तसेच बीड, पाथर्डी कडे जाणारे वाहने पिंपळवाडी मार्गी वांजरा फाटा मार्गी जातात यात अनेक बस पण याच मार्गी जातात पण आता पुल खचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तसेच साकत कोल्हेवाडी कडभनवाडी यांना जोडणारा लेंडी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या गावांचा संपर्क तुटला होता. आज परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला यामुळे नदीला पूर आला होता यातच साकत जवळील लेंडी नदीवर पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

नदीला पुर आल्यामुळे कडभनवाडी, कोल्हेवाडी, वराट वस्ती, कवडवाडी परिसरातील नागरिक यांचा संपर्क तुटला होता. अनेक दुधवाले व विद्यार्थी अडकले होते. सकाळी आठ वाजता जेसीबीच्या साहाय्याने दुधवाले व काही नागरिकांना नदीच्या दुसर्‍या किनारी सोडण्यात आले. शालेय विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुलाची उंची वाढवावी अशी मागणी होत आहे.

नगर जिल्ह्यात चार दिवस मुसळधार!
भारतीय हवामान खात्याने नगर जिल्ह्यात 17 ते 20 ऑगस्ट 2024 दरम्यान वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. यानुसार, जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन:
– मेघगर्जनेच्या वेळी किंवा वीज चमकत असताना झाडाखाली उभे राहू नये. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या.
– गडगडाटीच्या वादळात विद्युत उपकरणांचा वापर टाळा.
– धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे टाळा.
– लटकणा-या केबल्स, धातुचे कुंपण, विद्युत खांब यांपासून दूर राहा.
– जाहिरात फलकांच्या आजूबाजूला थांबू नका.
– वीज चमकत असताना मोकळ्या जागेवर गुडघ्यावर बसून सुरक्षित रहा.
– सखल भागात राहणारे नागरिक तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करा. नदी, ओढे व नाल्यांपासून दूर रहा.
– भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या शक्यतेमुळे डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्यांनी विशेष दक्षता घ्या.
– घाट रस्त्याने प्रवास टाळावा आणि धरण किंवा नदीक्षेत्रात पर्यटन करताना विशेष खबरदारी घ्या.
आपत्कालीन परिस्थितीत तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांचेशी 1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क साधावा. असे आवाहनही प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खळबळजनक! शिर्डीतील साई मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी

शिर्डी । नगर सहयाद्री:- पहलगाम हल्ल्यानंतर आता महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं आणि मोठं मानलं जाणारं देवस्थान...

पोलीस दलात खळबळ! उपनिरीक्षकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल

पणे । नगर सहयाद्री:- कायद्याचे रक्षक म्हणून ओळख असलेल्या पोलीस खात्याची काही भक्षक बनलेल्या पोलिसांमुळे...

६०० रुपयात मिळणार एक ब्रास वाळू; ‘असा’ करा अर्ज..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विविध योजनांमधील राज्यातील घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रास पर्यंत मोफत वाळू उपलब्ध...

पाकिस्तानला मोठा धक्का!; भारताचा महत्वपूर्ण निर्णय

India vs Pakistan: भारत सरकारने आता पाकिस्तानमधून येणाऱ्या वस्तूंवर पूर्ण बंदी घातली आहे. म्हणजेच...