पारनेरमध्ये उत्तरा नक्षत्राची जोरदार बॅटिंग / रस्त्यांची दुरवस्था, हंगा नदीला पूर, शेताला तळ्याचे स्वरूप
सुपा| नगर सह्याद्री
तालुक्यात सोमवारी दि. १५ सप्टेंबर रोजी पहाटे तीन ते सकाळी नऊ वाजेपर्यंत उत्तरा नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावत दमदार बॅटिंग केली. या ढगफुटी सदृश पावसाने ओढे नाले ओसंडून वाहू लागले. तर शेतकर्यांच्या शेतात मुगार पडल्याने माती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. काही शेतात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले होते.
चालू वर्षी उन्हाळ्यात प्रचंड उष्णता जाणवत होती, उन्हाचा पारा ४३ अंश सेल्सिअस वर चढल्याने नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागला. यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाले. सलग आठ ते दहा दिवस पडलेल्या मुसळधार पावसानंतर शेतकर्यांनी आपल्या शेतात मूग, बाजरी, सोयाबीन, तूर पेरणी केली. मात्र मे महिन्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने मुगाचे पीक हातचे गेले. शेतकर्यांनी कसे बसे सावरत पेरणीपूर्व मशागत केली. सोमवारी मध्यरात्री पावसाने तालुयात सर्वदूर हजेरी लावल्याने शेतकर्यांच्या रब्बी हंगामासाठी आशा पल्लवीत झाल्या आहेत.

brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 35;
सुपा येथील मेन चौकातील गटार तुंबृन नगर-पुणे महामार्गावर पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले होते. सुपा शहरात मुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण शहर जलमय झाले. बाजारतळ व सुपा बसस्थानकात पाणी आल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. नगर-पुणे महामार्गावर चालकांना गाड्या काढताना मोठी कसरत करावी लागली. तर तालुयात उत्तरा नक्षत्राच्या पावसाने हंगा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साठल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली. खरीप हंगामातील मुगाचे पीक हातचे गेले. मात्र रब्बी हंगामातील पिकासाठी सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने हे पीक तर हाती लागेल या आशेमुळे शेतकर्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
भोयरे गांगर्डा, आपधूप, कडूस, बाबुर्डी येथे विजेचा खेळखंडोबा
उत्तरा नक्षत्राच्या प्रचंड पावसामुळे सुपा परिसरातील महावितरणचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. पाऊस सुरू होताच महावितरण कडून विद्युतपुरवठा बंद केला जातो. यात नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बाबुर्डी, भोयरे गांगर्डा, कडूस, रुईछत्रपती, आपधूप येथील वीजपुरवठा खंडित झाला असता विविध कंपन्यांचे टॉवर देखील बंद होतात. पर्यायी गावच रेंजच्या बाहेर असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
निघोज परिसरात दमदार पाऊस
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील निघोज व परिसरात मध्यरात्री २ ते पहाटे ६ वाजेपर्यंत सततच्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे दळणवळण यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली असून, देवीभोयरे येथील पूल वाहून गेल्याने निघोज-देवीभोयरे आणि देवीभोयरे फाटा हा रस्ता बंद करण्यात आला आहे. परिणामी, शिरुर-कल्याण आणि आळेफाटा येथील एस.टी. बसेस निघोज, शिरापूर, पाबळ मार्गे अळकुटी येथून सोडण्यात आल्या आहेत. या पावसाळ्यातील पहिल्याच जोरदार पावसाने निघोज परिसराला झोडपले असून, रस्ते वाहतूक आणि दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.
तालुयातही सर्वदूर पाऊस सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाची प्रतीक्षा करणार्या शेतकर्यांना दमदार पावसाने दिलासा दिला आहे. तालुयाच्या उत्तर भागातील भाळवणी, ढवळपुरी, टाकळी, ढोकेश्वर, वासुंदे, कर्जुले हर्या आणि तिखोल या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात चांगला पाऊस झाला आहे. पावसामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत, ज्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, जोरदार पावसाने काही ठिकाणी रस्ते आणि पिकांचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.