मुंबई। नगर सहयाद्री-
मान्सूनपूर्व पावसाच्या सलामीने राज्यातील रखरखत्या उन्हाचा चटका कमी झाला आहे. काल अनेक ठिकाणी पाऊस झाल्यानंतर आता पुन्हा एकदा हवामान खात्याने राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला दिला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पावसाचा जोर कायम राहणार असल्याच म्हंटल आहे.
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार ,सोमवारी दुपारनंतर अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळणारआहे. पुणे, नगर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळतील.
तसेच नंदुरबार, जळगाव आणि बीड जिल्ह्यातही तुफान पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यात गारपिटीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने पुणे, मावळ, शिरूर अहमदनगर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात काही ठिकाणी हलका तर कुठे मुसळधार पाऊस पडत आहे. आज सोमवारी देखील दुपारनंतर अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज आहे.