spot_img
महाराष्ट्रसावधान! राज्यात उष्णतेचा कहर; ‘या’ जिल्ह्यांत उष्णतेची लाट येणार?

सावधान! राज्यात उष्णतेचा कहर; ‘या’ जिल्ह्यांत उष्णतेची लाट येणार?

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडाल्याच चित्र बघायला मिळत आहे. परिणामी नागरिकांना होळी पूर्वी प्रचंड उष्ण व दमट हवामानाला सामोर जावं लागत आहे.नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने आज 11, 12 आणि 13 मार्चला विदर्भातील अकोल्यासह काही भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. संभाव्य उष्णतेच्या लाट लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन ही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेने कहर केलाय. सोमवारी पुणे, नंदुरबार शहरांचा पारा 39.5, तर अकोला शहराचे तापमान 38.8 अंश सेल्सिअसवर गेलाय. मागील काही दिवसांपासून कमाल तापमान 35 अंशांवर असलेल्या नाशिक शहरातील तापमानाचा पारा सुद्धा वाढलाय. सोमवारी उष्णतेची लाट चांगलीच जाणवली. पुणे, नंदुरबार, मुंबई ही शहरे चांगलीच तापली होती. मात्र, काही भागांतील कमाल तापमानात किंचित घट झाल्याची नोंद करण्यात आली.

कमाल तापमानाचा पारा एक अंशाने कमी झाला होता. मात्र पुण्यासह, नंदुरबार आणि अकोला शहरांचा पारा सलग तिसर्‍या दिवशी सर्वाधिक ठरला. नाशिकमध्ये आज यलो अलर्ट देण्यात आला असून तापमानाचा पारा चाळीशीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सोमवारी मुंबई आणि तेथील सांताक्रुझ भागाचा पारा अनुक्रमे 36.4 आणि 37.2 अंशांवर गेला होता. त्यामुळे मुंबईकरांच्या घामाचा धारा वाहू लागल्या होता. यावर्षाच्या हंगामात मुंबईचे तापमान सलग तिसर्‍यांदा 36 अंशांपेक्षा जास्त वाढले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...