राजस्थान / नगर सह्याद्री : सध्या थंडी सुरू आहे. त्यामुळे अनेक लोक घरात हिटर वापरात. जेणेकरून वातावरण गरम राहील. याचा अति वापर आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. अशाच प्रकारच्या हिटरचा वापर केल्याने राजस्थानमधील एका कुटुंबाच्या जीवावर परिणाम झाला.
रात्रभर हीटर चालू ठेवून झोपलेले असताना त्या हिटरमुळे लागलेल्या आगीत एका कुटुंबाचा मृत्यू झाला. त्यात पिता व अवघ्या दोन महिन्यांच्या लेकीचा मृत्यू झाला. तर जखमी महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ही घटना राजस्थानच्या अलवर येथे घडलीये. अवघ्या दोन वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज झालेल्या दांपत्याला दोन महिन्यांपूर्वीच मुलगी झाली. घरात आनंदाच वातावरण होतं. घटनेच्या दिवशी गावात खूपच थंडी होती. पती-पत्नी आपल्या दोन महिन्यांच्या निरागस मुलीसह खोलीत झोपले होते.
थंडीपासून वाचण्यासाठी त्यांनी खोलीत हीटर लावला होता. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास हीटरला अचानक आग लागली आणि बघता बघता तिचा भडका उडून ती पसरली. खोलीत आगीने रौद्ररूप धारण केले, त्यामुळे होरपळलेल्या वडील व मुलीचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमीमहिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातात संपूर्ण कुटुंबाने प्राण गमावले. दीपक संजू त्यांची मुलगी निशिका अशी मृतांची नावे आहेत.