Weather Update: सूर्य तळपायला लागल्याने राज्यातील तापमानात वाढ होत आहे. काल तापमान रेकॉर्ड मोडत ३९.२ अंश सेल्सिअसवर कमाल तापमानाचा पारा होता. किमान तापमान २२ अंश सेल्सिअसवर होते. तापमान झपाट्याने वाढू लागले आहे. बुधवारचे तापमान ३७.२ अंश सेल्सिअस कमाल, तर २१.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मार्चमधील १२ दिवसांत सहा वेळा उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमधील अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. विदर्भात आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यवतमाळ अमरावती, अकोल्याच्या समावेश देखील आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याती ब्रम्हपूरीत सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर अनेक शहरांमध्ये तापमान ४०, ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. विदर्भात आज तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा असल्यानं गरज असल्यास घराबाहेर पडावे, योग्य काळजी घ्यावे असे आवाहन केले आहेत.
दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्यात उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. पुणे शहरातील लोहगाव परिसरात गुरुवारी ४०.४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद तर जिल्ह्यातील शिरूरमध्ये सुद्धा ४० शी पार केले आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये ४१.३ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहरातील लोहगाव भागात ४०.४ इतक्या तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आणखी २ दिवस पुण्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.