Maharashtra Weather Update: राज्यातील थंडी गायब होऊन आता तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उकाडा वाढायला सुरूवात झाली आहे. राज्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. राज्यातील तापमान ३७ अंशावर पोहचले आहे. सोलापूरमध्ये राज्यातील उच्चांकी ३७.३ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर निफाडमध्ये सर्वात निचांकी ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस राज्यातील बहुतांश भागांत तापमानात फारसा बदल होणार नाही. ज्यातील तापमानात सध्या जसे आहे तसेच राहिल. सध्या राज्यातील कमाल तापमान सातत्याने ३५ अंश सेल्सिअसच्या वरती जात असल्यामुळे उन्हाची चाहूल लागली आहे. पहाटे हलकी थंडी आणि दुपारी कडाक्याचे ऊन असल्यामुळे आता उन्हाचे चटके जाणवू लागले आहे. राज्यात अनेक ठिकाणी प्रचंड उकाडा जाणवू लागला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यामध्ये सकाळची थंडी आणि हलके धुके पाहायला मिळत आहेत. तर दुपारी तीव्र उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांनी आता ऊन वाढत असल्यामुळे आपली काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पहाटे थोडासा गारवा जाणवत आहे आणि दुपारी उन्हाच्या झळा लागत आहेत.