Maharashtra News Today: काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. लग्नाच्या २ दिवस आधीच एका तरूणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. तरूण दुचाकीवरून जात असताना एका वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू झाला. नंतर वाहनचालक फरार झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चकनाचूर झाला आहे. या घटनेत तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. फरार वाहनचालकाचा शोध पोलीस घेत आहेत.
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजेगाव रस्त्यावर एक भीषण अपघात घडला आहे. आज सकाळी अज्ञात वाहनाने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. गणेश तनपुरे असे मृत तरूणीचे नाव आहे. तो सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी गावचा रहिवासी होता. गणेश याचा २ दिवसानंतर विवाह सोहळा असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. मात्र, लग्नाच्या २ दिवस आधीच गणेशचा अपघाती मृत्यू झाला आहे. तरूण दुचाकीवरून जात होता. यादरम्यान, एका अज्ञात वाहनाने त्याला जबर धडक दिली.
धडक दिल्यानंतर वाहन चालकाने घटनास्थळावरून पलायन करण्याचा प्रयत्न केला. पलायन करत असताना वाहन चालकाने त्याला दोनशे फूट फरफटत नेले.फरफटत नेल्यामुळे तरूणाचा जागीच मृत्यू झाला आणि दुचाकीचेही अनेक भाग रस्त्यावर पडले होते. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करीत आहेत. तसेच फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.