spot_img
राजकारणGST वरून अजित पवारांना सुनावलं, आ. थोरांतांनी थेट हॉटेलंचं बिलच सांगितलं

GST वरून अजित पवारांना सुनावलं, आ. थोरांतांनी थेट हॉटेलंचं बिलच सांगितलं

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विधानसभेत अर्थसंकल्पातील भांडवली तूट आणि जीएसटीच्या मुद्दयावर चर्चा झाली असता अजित पवारांनी जीएसटीमुळे राज्य सरकारचे उत्पन्न वाढल्याचे सांगत केंद्र सरकारला सर्वाधिक १६ टक्के वस्तू व सेवा कर देणारं आपलं राज्य असल्याचे सांगितले.

अजित पवारांच्या या विधानावर बाळासाहेब थोरात यांनी सवाल उपस्थित केले. तसेच, जीएसटीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला असून रेस्टॉरंटमध्ये ३ जणांच्या जेवणाचं बिल पाहिल्यास चौथा माणूस जीएसटीमध्ये जेऊन गेला की काय, असा प्रश्न पडतो, असे म्हटले. आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रतिप्रश्न करत जीएसटीमुळे सर्वसामान्य नागरिक वैतागल्या असल्याची भावना अजित पवारांसमोर बोलून दाखवली.

केंद्र सरकारला जीएसटीचा मोठा वाटा आपल्याकडून जात असेल. त्यामुळे, राज्य सरकारला केंद्राकडून जीएसटीचा वाटाही मिळत असेल. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांना हा जीएसटी कौतुकाचा वाटत असेल, पण जनतेला जीएसटी कौतुकाचं वाटत नाही. प्रत्येक गोष्टीच जीएसटी, जीएसटी… त्या जीएसटीमुळे जनतेचे हाल सुरू आहेत, असे म्हणत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हॉटेलमधील बिलाचं उदाहरण दिलं.

आज हॉटेलमध्ये तीनजण जेवायला गेले तर आलेल्या बिलातील जीएसटी पाहून चौथा माणूस जेवला काही काय अशी भावना निर्माण होते. कधी कधी असंही म्हटलं जातं की केंद्र सरकार चौथं जेवलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जीएसटीचा भार सर्वसामान्यांवर आहे, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी संताप व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...