spot_img
आरोग्यHealth Tips: सावधान! प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिताय? हे' आहेत दुष्परिणाम..

Health Tips: सावधान! प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिताय? हे’ आहेत दुष्परिणाम..

spot_img

नगर सह्याद्री टीम

प्लास्टिकच्या सततच्या वापरामुळे केवळ आपल्या आरोग्यावरच परिणाम होत नाही, तर त्यामुळे आपल्या पर्यावरणाचेही खूप नुकसान होते.आपले काम सोपे करण्यासाठी प्लास्टिक खूप उपयुक्त आहे. यापैकी एक गोष्ट म्हणजे प्लास्टिकच्या बाटलीचा वापर लोक मोठ्या प्रमाणात करतात.इतकंच नाही तर बाजारात वेगवेगळ्या रंगांच्या आणि डिझाइन्सच्या अनेक प्रकारच्या बाटल्या उपलब्ध आहे. ज्यांचा लोक सतत वापर करत असतात. पण तुम्हाला माहित आहे का प्लास्टिकच्या बाटलीत ठेवलेले पाणी प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

कर्करोगासह अनेक आजारांचा धोका

प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने त्यातील घातक रसायने आपल्या शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे आपल्याला अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. प्लॅस्टिकमध्ये असलेली हानिकारक रसायने जसे की शिसे, कॅडमियम आणि पारा शरीरात कर्करोग, अपंगत्व यासारख्या गंभीर समस्यांची शक्यता वाढवतात.

प्रतिकारशक्तीवर परिणाम

प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये साठवलेले पाणी प्यायल्याने गंभीर आजारांचा धोका तर वाढतोच, पण त्याचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरही वाईट परिणाम होतो. वास्तविक, प्लास्टिकमध्ये असलेली हानिकारक रसायने पाण्याद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते.

प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधील पाणी हे मंद विष आहे

प्लास्टिकमध्ये अनेक प्रकारची हानिकारक रसायने आढळतात, ज्यामुळे आपल्या आरोग्याला खूप हानी पोहोचते. अशा परिस्थितीत जर पाणी त्यात ठेवले तर त्यात फ्लोराईड, आर्सेनिक आणि अॅल्युमिनियमसारखे हानिकारक घटक तयार होतात, जे सेवन केल्याने ते आपल्या शरीरात स्लो पॉयझनसारखे काम करते. त्यामुळे तुमची तब्येत हळूहळू बिघडू लागते.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी… नवाब मलिक यांना कोर्टाचा मोठा दणका… दाऊदच्या मालमत्ता प्रकरणात नेमकं काय घडलं?

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालय विशेष...

शहाजी बापू संतापले; ‘भाजपचे राजकारण हिडीस अन् अबलेवर बलात्कार केल्यासारखे..’ नेमकं काय म्हणाले?

मुंबई / नगर सह्याद्री - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष...

पालक, शिक्षकांना मोबाइलच्या तोट्यांची माहिती देणार : मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी

जिल्हा परिषद व ‘ऋणानुबंध’च्या संयुक्त विद्यमाने मोबाइलवर कार्यशाळा अहिल्यानगर | नगर सह्याद्री विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी...

आश्रमशाळेच्या नावाखाली २ कोटी ४८ लाखांचा डल्ला; नगरमधील प्रकार

सद्गुरू रोहिदासजी संस्थेच्या अध्यक्षासह सात पदाधिकार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा अहिल्यानगर | नगर सह्याद्री  केंद्र शासनाकडून आश्रमशाळेसाठी मिळालेल्या...