spot_img
अहमदनगररात्री शेतात झोपण्यासाठी गेला पण परतलाच नाही, सकाळी-सकाळी परिसरात उडाली एकच खळबळ,नेमकं...

रात्री शेतात झोपण्यासाठी गेला पण परतलाच नाही, सकाळी-सकाळी परिसरात उडाली एकच खळबळ,नेमकं घडलं तरी काय? पहा..

spot_img

कोपरगाव । नगर सहयाद्री:-
तालुक्यातील धारणगाव शिवारात एक धक्कादायक घटना घडली आहे.रात्री शेतात गेलेला मुलगा सकाळी घरी प्रतलाच नाही. त्याचा शोध घेण्यासाठी वडील व चुलत भावाने शेतात धाव घेतली असता तो शेतातील शेडमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घडलेल्या प्रकरणामुळे धारणगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.नितीन शांताराम वाणी (वय ३९ वर्षे) असे मयत इसमाचे नाव असून, तो टाकळी येथील रहिवासी आहे.

अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी नितीन शांताराम वाणी हे आपल्या कुटुंबासह टाकळी येथे राहत होते. धारणगाव परिसरातील किरण शंकरराव दंडगव्हाळ यांची शेती ते वाट्याने करीत होते. त्या शेतातील शेडमध्ये नितीन वाणी यांचे पाळीव जनावरे असल्याने नितीन कधीकधी रात्री तेथे झोपण्यासाठी जात असत. ते शुक्रवारी रात्रीही तेथे झोपण्यासाठी गेले होते. शनिवारी ते सकाळी घरी न आल्याने व त्यांचा फोन न लागल्याने वडील व चुलत भावाने शेतात जाऊन पाहिले असता नितीन शेतातील शेडमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

त्यांनी सदर घटनेची माहिती पोलीस पाटील जिजाबाई निळू रनशूर यांना दिली. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. पो. उपनिरीक्षक महेश कुसारे, पो. कॉन्स्टेबल रमेश झडे, रशीद शेख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भागचंद पोपट वाणी यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...